Goa Sugarcane Production Dainik Gomantak
गोवा

Goa Sugarcane Production: ऊस उत्‍पादनात 61,500 टनांची मोठी घट, गेल्‍या 38 वर्षांत 80 हजार टनांवरून उत्पादन घसरले 18,500 टनांवर

Goa agriculture: घटकराज्‍याचा दर्जा मिळाला, त्‍या काळात गोवा राज्‍य ऊसाच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : घटकराज्‍याचा दर्जा मिळाला, त्‍या काळात गोवा राज्‍य ऊसाच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण होते. मात्र गेल्‍या ३८ वर्षांत ऊसाचे उत्‍पादन तब्‍बल ६१,५०० टनांनी घटल्‍याचे राज्‍य सरकारने जारी केलेल्‍या ताज्‍या अहवालातून समोर आलेले आहे.

१९८७-८८ या काळात राज्‍यात ८० हजार टन ऊसाचे उत्‍पादन घेतले जात होते. परंतु २०२५ मध्‍ये ते उत्‍पादन १८,५०० टन एवढे खाली आले असल्‍याचे या अहवालातून दिसून येते.

१९८७-८८ मध्‍ये राज्‍यातील १,३०,५७५ हेक्‍टर जमीन कृषी लागवडीखाली होती. गेल्‍या ३८ वर्षांच्‍या काळात कृषी लागवडीखालील जमिनीत १५,४२५ ने वाढ झाली. परंतु, २०२४-२५ च्‍या तुलनेत २०२५-२६ मध्‍ये त्‍यात केवळ ४०४ हेक्‍टरने वाढ झाली.

त्‍यात एकापेक्षा अधिकवेळा पेरणी केलेल्या क्षेत्रात ९,६०७ हेक्‍टरनी वाढ झाली असली, तरी २०२४-२५च्‍या तुलनेत २०२५-२६ या वर्षात ही वाढ केवळ ३१७ हेक्‍टर इतकीच असल्‍याचे अहवालातून दिसून येते.

भात, नारळाच्‍या उत्‍पादनातही घट

घटक राज्‍याचा दर्जा मिळाला त्‍यावेळी गोव्‍यात ७१,०७० टन इतक्‍या भाताचे उत्‍पादन मिळत होते. त्‍यानंतर २०२४-२५ पर्यंत त्‍यात ५,५१९ टनांनी वाढ झाली. परंतु, २०२५-२६ या काळात भाताच्‍या उत्‍पादनात १,५८९ टनांनी घट होऊन यावर्षी केवळ ७५ हजार टन भाताचेच उत्‍पादन झाले.

दुसरीकडे आहारातील प्रमुख घटक असलेल्‍या नारळाचे उत्‍पादनही वर्षभरात ५.७९ मिलियन नट्सनी घटले आहे. २०२४-२५ मध्‍ये नारळाचे उत्‍पादन १५०.७९ मिलियन नट्स इतके होते. तर, २०२५-२६ मध्‍ये १४५ मिलियन नट्स इतक्‍याच नारळाचे उत्‍पादन झाल्‍याचेही अहवालातून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT