Goa Agriculture  Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture : ऊस उत्पादक 8 रोजी राजधानीत धडकणार; आझाद मैदानावर 250 शेतकऱ्यांना घेऊन छेडणार आंदोलन

Goa Agriculture : संघटनेची माहिती असे ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Agriculture : फोंडा, संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर अवलंबून असलेले ऊस उत्पादक संघटनेने सोमवार, ८ जानेवारीपासून पणजीतील आझाद मैदानावर २५० शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार, असे जाहीर केले आहे.

जोपर्यंत सरकार आमच्या मागण्यांची पूर्तता करत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहील, असे ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

संजीवनी हा राज्यातील एकमेव शेतकऱ्यांचा कारखाना आहे, तो कायमस्वरूपी बंद केल्यास राज्यातील शेतकऱ्यांवर संकट ओढवेल. म्‍हणूनच राज्‍य सरकारने कारखान्या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा. इथेनॉल संदर्भात जो प्रस्ताव कंत्राटदाराने दिला आहे, त्याचा योग्य विचार करून कारखाना सुरू करावा. जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक प्रश्न सुटेल, असेही राजेंद्र देसाई म्हणाले.

या पुढे ऊस लावायचा की नाही हे स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शेतकऱ्यांना सांगावे. जेणेकरून शेतकऱ्यांना सरकारचा निर्णय समजेल, असे फ्रान्‍सिस मास्कारेन्हास यांनी सांगितले. आंदोलनाच्या दिवसांत संजीवनी सहकारी साखर कारखान्यासमोर घोषणांनी संपूर्ण परिसर हादरून सोडला. संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खास बसगाड्यांची सोय

एका यूट्यूब चॅनेलवरून एक पत्रकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी जाऊ नये, असे सांगून शेतकऱ्यांमध्ये दुफळी निर्माण करीत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी अशा आवाहनाला बळी पडू नये.

मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ८ जानेवारीला पणजीत जाण्यासाठी बाहेर पडावे. सांगे, कुळे, शिगाव, साकोर्डा तसेच इतर भागांतून बसची सोय केली आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहनही ऊस उत्पादक संघटनेने केले आहे.

आंदोलनाला वाढता पाठिंबा :

ऊस उत्पादक संघटनेने २ जानेवारीपासून फॅक्टरीच्या गेटसमोर साखळी आंदोलन सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील हे संपूर्ण दिवस उपस्‍थित राहिले.

त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, सावर्डे गट मंडळ अध्यक्ष जयेश पाटील, गौतम भंडारी, आरजीचे नेते मनोज परब, ‘सवेरा’च्या तारा केरकर यांनी आंदोलनला पाठिंबा दिलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT