Goa Students Eye Defects: Dainik Gomantak
गोवा

Goa Students Eye Defects: राज्यातील 8 टक्के विद्यार्थ्यांना दृष्टीदोष; सरकारी तपासणीतून समोर आली बाब

आवश्यकतेनुसार उपचार, तसेच चष्मे सरकार देते मोफत

Akshay Nirmale

Goa Students Eye Defects: आरोग्य सेवा संचालनालयाने (डीएचएस) एप्रिलपासून सहा महिन्यांच्या कालावधीत 196 शाळांमधील 11840 विद्यार्थ्यांची तपासणी केली.

त्यात 8 टक्क्यांहून अधिक म्हणजेच 991 विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असल्याचे निदान झाले आहे. यापैकी 927 जणांमध्ये अपवर्तक त्रुटी होत्या, तर 64 जणांमध्ये डोळ्यातील इतर दोष होते.

राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रम (NPCB&VI) चा एक भाग म्हणून सरकारने ही तपासणी केली होती. यात उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती.

डीएचएसने सांगितले की, उर्वरित शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी चालू शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस केली जाईल.

अपवर्तक त्रुटी जसे की मायोपिया (नजीकदृष्टी) आणि हायपरोपिया (दूरदृष्टी) म्हणजे जेव्हा कॉर्निया आणि लेन्स डोळयातील पडद्यावर अचूकपणे प्रकाश केंद्रित करत नाहीत असे दोष होत.

दरम्यान, गरज भासल्यास, वरिष्ठ नेत्रतज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांची सरकारी आरोग्य सुविधांमध्ये तपासणी केली जाते. आवश्यकतेनुसार उपचार, तसेच चष्मे सरकारकडून मोफत दिले जातात.

आरोग्य तज्ज्ञ या समस्येचे कारण सांगताना मुलांच्या वाढलेला स्क्रीनटाईमला दोष देतात. जास्त स्क्रीन टाईममुळे डोळ्यांवर ताण येतो. पालकांचे त्यावर नियंत्रण असले पाहिजे, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अनुवांशिक कारणानेही दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो. मुलांमध्ये पोषणाची कमतरता असेल इतर काही आरोग्य समस्या असेल तर कॉर्नियामध्ये बदल होत असतो. वातावरण, तापमान, अतिनील किरणांचाही परिणाम होतो.

अशा रुग्णांवर वेळीच उपचार न केल्यास त्यांची दृष्टी कायमची गमवावी लागू शकते. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Gaonkar: राज्यपालांनी शपथ घेण्यास दिलेला नकार, हुकलेले पद ते नवीन सभापती म्हणून नेमणूक; गणेश गावकरांचा प्रवास

Ganesh Gaonkar: ‘एकावेळी एकानेच बोला’! नवनियुक्त सभापतींचे पहिल्‍याच दिवशी शिस्‍तीचे धडे; आमदारांना दिली तंबी

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

SCROLL FOR NEXT