हरमल: गोव्याच्या माजी शिक्षणमंत्री संगीता गोपाळ परब यांची नात व उद्योजक सचिन परब यांची कन्या तथा पणजी ओल्ड गोवा पठारावरील सनशाईन स्कूलची विद्यार्थिनी कु. वनिष्ठा सचिन परब हिने राष्ट्रीय युवा सांसद म्हणून गोवा राज्याचे नेतृत्व करून वाहवा मिळवली.
राजस्थान जयपूर मधील विधानसभेत राष्ट्रीय युवा संसद अधिवेशन झाले.यात वनिष्ठा हिने दहशतवाद, भारत-पाकिस्तान सबंध व अलीकडच्या काळातील पहलगाम क्रूर व भ्याड हल्ला व भारतीय सिंदूर ऑपरेशनबाबत तिखट शब्दांत विचार मांडले.
दहशतवाद म्हणजे स्वातंत्र्य नव्हे किंवा युवकांचे ब्रेन वॉशिंग म्हणजे राष्ट्रीयत्व नव्हे. भारतीय सेनेने कधीही युद्धासाठी तळ उभारले नाहीत, मात्र शत्रू राष्ट्राने उभारलेले तळ उद्ध्वस्त करण्यासाठी पावले उचलली, त्यात दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठीची खास रणनीती होती, असे युवा संसदपटू वनिष्ठा परब यांनी स्पष्ट व ओघवत्या शैलीत व्यक्त केले.
भारतीय संरक्षण दल, देशातील दहशतवाद मोडून टाकण्यासाठी अनेक आधुनिक शस्त्र,शस्त्रे व उच्च तंत्रज्ञानाने युक्त मशीन तैनात करीत आहे, तसेच योग्य टेहळणीसाठी अत्याधुनिक प्रक्षेपण सुविधांचा वापर सुरू केला. अलिकडे वाढत्या दहशतवादी कृत्यांमुळे पोलिस व अन्य दलांसाठी खास प्रशिक्षण सुविधा देणे गरजेचे बनले असून त्यासाठी सरकारने कटिबद्ध होणे गरजेचे आहे. देशाने अन्य देशांशी संबंध प्रस्थापित करून उपयुक्त उपक्रम राबवणे शक्य आहे.
सद्यकाळात राष्ट्राची सुरक्षा सर्वोत्तम करण्यासाठी आधुनिक पद्धतीने सज्ज होण्याची गरज आहे असे, युवा संसदपटू विद्यार्थिनी वनिष्ठा परब हिने व्यक्त केले. ह्या संसदपटू गटात गोव्यातील विद्यार्थ्यांचा समावेश होता, मात्र एकमेव वनिष्ठा परब हिने उत्स्फूर्त भाषण केले. ह्या परिषदेत देशातील १६८ विद्यालयांनी भाग घेतला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.