Sand mining in goa rivers Dainik Gomantak
गोवा

वाळूमाफियांना बसणार चाप! जनतेसाठी हेल्पलाईन जाहीर; तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक जाणून घ्या..

Goa sand mafia helpline number: राज्यातील बेकायदेशीर वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाला ‘सतर्क प्रहरी’ बनविण्याचा मार्ग उच्च न्यायालयाने मोकळा केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील बेकायदेशीर वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाला ‘सतर्क प्रहरी’ बनविण्याचा मार्ग उच्च न्यायालयाने मोकळा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सर्व तालुक्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्याचे आदेश देत, नागरिकांना थेट तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

गोवा रिव्हर सँड प्रोटेक्टर्स नेटवर्क संस्थेने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सुनावणी झाली. २०१९ पासून सुरू असलेल्या न्यायालयीन आदेशानंतरही नद्यांमधील वाळूउत्खनन थांबले नाही असे संस्थेने न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले होते.

या समस्येविरोधात एकत्रित कारवाई आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांनी नोंदविले. राज्य सरकार व पर्यावरणप्रेमींनी एकत्र सादर केलेल्या कृती आराखड्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे. महाधिवक्ता देविदास पांगम यांनी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होईल असे आश्वासन दिले, तर वरिष्ठ वकील नॉर्मा आल्वारीस यांनी, व्यवस्था प्रत्यक्षात कार्यक्षम ठरली नाही तर न्यायालयात पुन्‍हा दाद मागू, असा इशारा दिला.

माफियांविरोधात मोहीम

तालुकास्तरावर भरारी पथके उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पुनर्गठित करण्यात आली. त्यात पोलिस, खाण, नदीपरिवहन आणि बंदर विभागाचे अधिकारी समाविष्ट.

किनारी पोलिस दलाला रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत आकस्मिक तपासणी करण्याचे आदेश.

नोंदणी नसलेल्या होड्या जप्त करणार.

तेरखोल, शापोरा, मांडवी, झुआरी नदी परिसरातील सहा प्रमुख मार्गांवर पहाटे ३ ते सकाळी १० या वेळेत गस्‍त.

हेल्पलाईन क्रमांक

उत्तर गोवा

तिसवाडी (९९२३०२३३१२),

बार्देश (८७६६०२२९३१),

डिचोली (९९६०८५२०५८),

सत्तरी (८७६६०४७४०७),

पेडणे (९४२०६९८४४२),

जिल्हा नियंत्रण कक्ष

(०८३२-२२२५३८३).

दक्षिण गोवा

सासष्‍टी (७०६६१२०७६६),

केपे (७९७२०८७७३५),

फोंडा (८७६६५६३७००),

काणकोण (९५७९८५८७१८), धारबांदोडा (९३५६८९४५४१),

सांगे (७८२२०६९०६७),

मुरगाव (८७६७८४१९६३),

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT