karan  Dainik Gomantak
गोवा

Kizomba Goa: आंतरराष्ट्रीय स्तरावर आफ्रिकन 'किझोम्बा' चा प्रचार करणारा गोमंतकीय

१३ ऑक्टोबर ला 'आंतरराष्ट्रीय किझोम्बा दिन' साजरा केला जातो. त्यानिमित्त या विशिष्ट नृत्य प्रकाराचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या गोमंतकीय तरुणाची ओळख.

Vinayak Samant

विविध संस्कृति, रूढी, परंपरेने नटलेला आपला भारत देश. इथली प्राचीन संस्कृति नेहमी परदेशी लोकांना आकर्षित करत असते. अनेक परदेशी संशोधकांनी भारतीय संस्कृतीवर गहन अभ्यास करून त्यावर पुस्तके लिहिली आहेत.

भारतातील शास्त्रीय नृत्य परंपरेने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनाच भुरळ घातली आहे. परदेशात मोठ्या प्रमाणात यांचे प्रशिक्षण दिले जाते. अशाप्रकारेच ‘किझोम्बा’ नावाचा नृत्याप्रकार आफ्रिका देशात केला जातो.

'किझोम्बा' हा एक भावपूर्ण आणि उत्कट नृत्यचा प्रकार आहे. १९८०-९० च्या दशकात आफ्रिकेच्या अंगोला गावात हा नृत्यप्रकार उदयास आला. या अनोख्या नृत्याची ओळख भारतीयांना करून देण्याची जबाबदारी एका गोमंतकीय तरुणाने उचलली आहे.

करण चौहान हा ओल्ड गोव्यातील तरुण सध्या डिचोली येथे वास्तव्यास आहे. त्याला गोव्यासह देशभरात ‘आफ्रो किझ बॉय’ या नावाने ही ओळखले जाते. तो आंतरराष्ट्रीय कलाकार असून त्याला ३० पेक्षा अधिक नृत्यशैली यातात.

करण हा केवळ नर्तक नसून तो एक अष्टपैलू कलाकार देखील आहे. जगभरातील प्रेक्षक त्याचा नृत्याचे दिवाने आहेत. देशभरात सतत प्रवास करून तो ‘किझोम्बा’ चे प्रशिक्षण देण्याचे काम करतो. प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्वतःला घडविले आहे.

कुटुंबात सर्वात मोठा असल्याने लहानपणा पासूनच त्याला समंजसपणा आणि जबाबदारीची जाणीव आहे. वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्याने व्यावसायिक पातळीवर नृत्याची सुरवात केली. समोर आलेल्या अडथळ्यांवर मात करत त्याने स्वतःचे शिक्षण पुर्ण केले आणि नृत्यकला जोपासली.

३० विविध प्रकारच्या नृत्यशैली माहीती असूनही ‘किझोम्बा’ या नृत्य प्रकाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचे तू का ठरविले असे विचारले असता करण म्हणाला की आजच्या यांत्रिक जगाच्या गडबडीत, जिथे आपल्यापैकी बरेच जण स्वतःच्या विश्वात मग्न असतात, तिथे भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडणारी ही कला मला खूप भावली.

ही कला व्यक्तींना जीवन, प्रेम आणि एकमेकांच्या संबंधाबाबत मार्गदर्शन करते. करणने विविध भारतीय शहरांमध्ये अनेक नृत्य महोत्सव भरवले आहेत. किझोम्बा फक्त संगीताच्या हालचालींपेक्षा अधिक असल्याचे तो सांगतो.

तो एक समर्पित नृत्य शिक्षक असून 'वेलकम डान्स कंपनी' चा संस्थापक आणि संचालक आहे. २०२१ मध्ये त्याने ही संस्था चालू केली. आत्तापर्यंत गोव्यात विविध ठिकाणी या संस्थेच्या १० शाखा आहेत. लहान मुले तसेच तरुण वर्गाची या नृत्य प्रकाराला पसंती मिळत असल्याचे करण ने सांगितले.

देश-विदेशात विविध स्तरांवर आपली कला सादर करणाऱ्या करण ने स्वतः ला प्रसिद्धीपासून नेहमीच अलिप्त ठेवले आहे. दुसऱ्यांना आपल्याकडे असलेली कला आणि ‘किझोम्बा’ शिकवण्यातच आपण समाधानी असल्याचे तो म्हणतो.

भारतात प्रतिनिधित्व करण्यासाठी मी किझोम्बाची निवड केली. हे नृत्य केवळ एक कलाप्रकार नाही तर एक तत्त्वज्ञान आहे जे आपल्याला वाढत्या डिस्कनेक्ट झालेल्या जगात अस्सल कनेक्शनच्या मूल्यांची आठवण करून देते. तुम्ही किझोम्बाच्या जगात या प्रवासाला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला संगीताची परिवर्तनीय शक्ती आणि नृत्यकलेची ताकद समजेल.
करण चौहान, संस्थापक, 'वेलकम डान्स कंपनी'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT