Aadhish Pednekar Dainik Gomantak
गोवा

माणसं वाचणारा गोव्यातील तरुण, बोटांचे ठसे वापरुन स्वभाव जाणून घेण्याची आधुनिक पद्धत

तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्तीच्या स्वभावातील विविध पैलूंवर उजेड टाकणारी आधुनिक पद्धत

Vinayak Samant

Aadhish Pednekar: एकविसाव्या शतकात विज्ञानाने उंच भरारी घेतली आहे. आजच्या आधुनिक युगात विज्ञानाच्या मदतीने जवळपास सगळ्याच गोष्टी शक्य होऊ लागल्या आहेत.

मानवाने अगदी सूर्यापर्यंत मजल मारण्याचे धाडस केले आणि त्यात यश पण मिळाले. अशाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्हाला स्वतःची नवी ओळख होऊ शकते.

डिचोलीतील एक ‘बडीस एडूवर्ड’ नावाची हस्तरेषा सामुद्रिक संस्था आहे. ही संस्था तुमच्या हाताच्या आणि बोटांच्या ठसे घेऊन त्यांचे अभ्यासपूर्वक अवलोकन करते.

जेणेकरून तुमच्या स्वभावात असलेले विविध पैलू कळतात. ही संस्था डिचोलीतील आधिश रवळनाथ पेडणेकर हा तरुण चलवितो.

वाणिज्य शाखेचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेला आधिश संगीताची आवड असल्याने सुरवातीला क्लब मध्ये डिजे चे काम करायचा नंतर त्याने एका सीए च्या हाताखाली ३ वर्षे कामाचा अनुभव घेतला आणि आता सध्या आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहतोय.

गोव्यात झालेल्या एका कॉर्पोरेट मीटिंगला आधिश वाडीलांसोबत गेला होता. तिथे त्याला या नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली आणि त्याने लगेच अशी संस्था सुरू करण्याचे ठरविले.

२०१५ साली त्याने या नवीन तंत्रज्ञान पद्धतीला सुरवात केली आणि आत्तापर्यंत जवळपास हजाराहून अधिक लोकांचे अवलोकन त्यांनी केले आहे.

या प्रक्रियेमध्ये प्रथम हाताच्या सर्व बोटांचे ठसे घेतले जातात. नंतर त्यावरच्या रेषा, चिन्हे, त्यांचे प्रकार ज्याला ‘रिच काऊंट’ म्हणतात, याचे बारकाईने निरीक्षण केल्यावर सर्व माहिती ‘डिमिट’ नावाच्या सॉफ्टवेअर मध्ये दिली जाते.

त्यानंतर ते सॉफ्टवेअर दिलेल्या माहितीचे पुर्ण अवलोकन करून शेवटचा निकाल देते.

हा संपुर्ण निकाल आल्यावर जन्मापासून तुमचा स्वभाव कसा आहे, कुठल्या विविध पैलूंवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे यासंबंधीचे समुपदेशन केले जाते. जर काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरेही त्याचवेळी दिली जातात आणि ही सर्व माहिती गुप्त ठेवली जाते.

सर्वात महत्वाचे म्हणजे एकदा संपुर्ण निकाल आल्यावर त्या व्यक्तीच्या हातांचे आणि बोटांचे ठसे डिलीट करून टाकले जातात.

MSME या सरकारद्वारे हाताळल्या जाणाऱ्या लघु उद्योग समूहाशी जोडली गेली असल्याने ही संस्था संपूर्णपणे कायदेशीर आहे.

दोन महिन्यांच्या तान्ह्या बाळपासून ते ६५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तिपर्यंत त्यांनी हा प्रयोग यशस्वी केलेला आहे. गोव्यातच नव्हे तर देशाबाहेरही यांचे समुपदेशनाचे काम चालू आहे.

एखादी व्यक्ति जर देशाबाहेर असेल तर त्याला हाताच्या बोटांचे ठसे कसे घ्यायचे याची संपुर्ण पद्धत सांगितली जाते आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीचे ठसे ऑनलाइन पद्धतीने घेतले जातात.

यामध्ये थोडा वेळ लागतो आणि निकाल आल्यावर त्या व्यक्तीला ऑनलाइन समुपदेश केला जातो.

आपली सनातन संस्कृती खूप समृद्ध आहे. ही प्रक्रिया जवळपास हस्तरेषा शास्त्रासारखीच आहे. यातून खूप लोकांना फायदा झाला असून आपण हे सर्व मिळकतीसाठी करीत नाही. आत्तापर्यंत आमच्या समुपदेशनाने काही जोडप्यांचे घटस्फोट होणे टळले आहे. त्यामुळे याचा किती फायदा लोकांना होतो हे दिसून येते
आधिश रवळनाथ पेडणेकर, डिचोली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT