Medicines  Dainik Gomantak
गोवा

Health News : आरोग्य सुविधा, उपचार वेळेत पुरवा ! गोवा खंडपीठाचे निर्देश

गेल्या काही वर्षांत आरोग्य सेवेत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी त्यामध्ये अजूनही कमतरता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Health News : पणजी, राज्यातील सरकारी इस्पितळे व आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना चांगली व वेळेत आरोग्य सेवा देण्यासाठी साधनसुविधा व पुरेसे कर्मचारी नाहीत. तेथे स्वच्छता, औषधे व उपचार उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे.

गेल्या काही वर्षांत आरोग्य सेवेत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी त्यामध्ये अजूनही कमतरता आहे. त्याची पूर्तता करण्याची सूचना गोवा खंडपीठाने केली आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्था बिकट असल्याची याचिका प्रकाश सरदेसाई आणि विश्‍वेश सरदेसाई यांनी २००७ साली सादर केली होती. याचिकेत आरोग्य सचिव, आरोग्य संचालक, गोवा वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळ, गोवा वैद्यकीय मंडळ तसेच भारतीय वैद्यकीय मंडळ यांना प्रतिवादी केले होते.

याकडे लक्ष द्या!

इस्पितळे, आरोग्य केंद्रांना वेळेवर व मुबलक औषधांचा पुरवठा करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धत सुरू करावी.

रिक्त जागा अधिक काळ भरल्याशिवाय ठेवू नयेत. त्यांची प्रक्रिया आधीच सुरू करावी. उपकरणांची दैनंदिन देखभाल करावी.

इस्पितळे, आरोग्य केंद्र प्रमुखांना आरोग्य सेवेसाठी लागणारा निधी वापरण्यासाठी विशेष अधिकार द्यावेत.

उपकरणांच्या दुरुस्तीसाठी प्रमुखांना अधिकार द्यावेत. गरीब, ज्येष्ठ नागरिक, अपंग, महिला व मुलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध कराव्यात.

आरोग्य हीच संपत्ती

सरकारी इस्पितळे, आरोग्य केंद्रे तसेच सरकारी दवाखान्यांमधील आरोग्य सुविधा, रुग्णांची औषधांसाठी होणारी परवड, सोयीसुविधा तसेच उपचारांची कमतरता यासंदर्भात ही याचिका सादर केली होती.

या याचिकेवर निवाडा देताना खंडपीठाने ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, सोन्या - चांदीचे तुकडे नाहीत’ अशा शब्दांत निरीक्षण नोंदवले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT