कधी कधी एखादा विचार समाजात मोठा बदल घडवू शकतो. एखादी छोटीशी कृती कितीतरी लोकांच्या जीवनात आशेचा किरण बनू शकते. त्याचप्रमाणे एखाद्याने त्याचा आवडीचे रूपांतर व्यवसायात आणि त्यातून सुरू केलेली चळवळ प्रत्येकासाठी आदर्श बनू शकते.
पर्वरी येथील साल्वाडोर दि मुंद मध्ये राहणारे सुदेश साळगांवकर यांनी अशीच एक चळवळ सुरू केली आहे. पेशाने आयटी व्यावसायिक आणि पणजी मधील ‘रुचिक’ या हॉटेल चे मालक अशी ओळख असलेले सुदेश साळगांवकर, त्यांनी सुरू केलेल्या चळवळीसाठी सुद्धा ओळखले जातात.
स्वतः एक उत्तम नर्तक, हार्मोनियम वादक आणि कलाकार असलेले सुदेश यांनी १२ वर्षांपूर्वी ‘निर्भय भव’ ही अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ची स्थापना केली. ज्यामध्ये नृत्य, संगीत आणि कला यांचे धडे दिले जातात. अखिल भारतीय गांधर्व महाविध्यालयातून हार्मोनियम चे शिक्षण त्यांनी घेतले आहे.
आवड म्हणून त्यांनी सुरवातीला गावागावांमधून नाटक करायला सुरवात केली. त्यानंतर विविध स्तरांवर नृत्य स्पर्धा, नाट्यस्पर्धा यात भाग घेऊन बक्षिसे मिळविली. त्यावेळी बक्षिसे भेट स्वरूपात मिळत असे. राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर आपण खूप पुरस्कार मिळविल्याचे ते सांगतात.
वैयक्तिक स्वरूपात जेव्हा अनेक बक्षिसे मिळविली त्यावेळी आपण सर्वांच्या नजरेत आलो आणि सर्वांनी मला सुचवले की एखादी अकादमी चालू करावी. त्यानंतर समविचारी लोकांशी चर्चा करून ‘निर्भय भव’ ची स्थापना २०१० मध्ये झाली असे ते म्हणाले.
या अकादमीचे सध्या ३५ हून अधिक सदस्य आहेत आणि खूप मेहनतीने ही अकादमी उभी केलेली आहे. गोव्यात डांस आणि निर्भय भव हे जणू समीकरणच झालेलं आहे. गोव्यात १३ ठिकाणी ह्या अकादमीच्या शाखा असून राज्याबाहेर मुंबई बोरिवली आणि कर्नाटकात हल्लीच शाखा सुरू केली आहे.
गोव्यामध्ये ऑगस्ट महिन्यात सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशन तर्फे करण्यात आलेल्या ‘सेव्ह सॉइल’ या चळवळीचे उद्घाटन ‘निर्भव भव’ च्या नृत्याने झाले हे विशेष. कोविड काळामध्ये कलेपासून दूर राहिलेल्या कलाकारांना परत कलेशी जोडण्याचे काम देखील त्यांनी केले आहे.
प्रत्येक वर्षी ‘निर्भय भव’ आपल्या नृत्यात नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुदेश साळगांवकर हे स्वतः आयटी क्षेत्रातले असल्याने एरवी चित्रपटांच्या माध्यमातून दिसणारे स्पेशल इफेक्ट ते प्रत्यक्षात आणतात. कौशल्य, अचूकता, सराव, कोरिओग्राफी आणि अभिनय यांची सांगड घातल्यास प्रयोग यशस्वी होतात.
एक मुकबधिर मुलगी ह्या ग्रुपमध्ये डांस करते हीच ‘निर्भय भव’ ची खासियत. यावर्षी पहिल्यांदाच एक तृतीयपंथीला ह्या ग्रुप ने दांडियामध्ये प्रमुख भूमिकेसाठी निवडले आहे तसेच दांडिया ही हिंदू संस्कृति असूनही एक मुस्लिम युवकाचा समावेश या डांस ग्रुपमध्ये आहे असे सुदेश यांनी सांगितले.
एक कलाकार या नात्याने आम्ही कसलाच भेदभाव ठेवत नाही. आमच्या सदस्यांच्या कौशल्यावर भर देणे आणि त्यात दरवेळी सुधारणा करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. आमच्या प्रत्येक सदस्याने राज्य तसेच राष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे हाच आमचा प्रयत्न असतो असे सुदेश म्हणतात.
गोव्यात नवीन शैक्षणिक धोरण सुरू होत असल्याने केंद्र सरकारच्या इतर अभ्यासक्रमात कला क्षेत्रासंबंधी एक नवीन विषय ‘निर्भय भव’ तर्फे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील सर्व महाविध्यालय आणि विध्यापीठामध्ये हा विषय लवकरच लागू होईल.
गोव्यातील कुठल्याच कलाकाराला इतर राज्यातिल कलाकारांसारखा पाठिंबा सरकार कडून मिळत नाही ही मोठी खंत आहे. इतर राज्य सरकार त्यांच्या कलाकारांची गैरसोय होऊ नये याकडे पूर्णपणे लक्ष देते. पण गोव्यात फक्त फाइल प्रोसेसिंग मधेच असते. जर राज्य सरकार ने वेळीच कलाकारांची दाखल घ्यावी हीच अपेक्षा आहे. नेपाळ चे पूर्व प्रधानमंत्री मधवराज यांनी आपल्या मोबाइल सतंतुसवर ‘निर्भय भव’ च्या फोटो ठेऊन कौतुक केले ही आमच्यासाठी सर्वात मोठा क्षण होता.सुदेश साळगांवकर, संस्थापक, 'निर्भय भव'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.