Parshuram Matoli Dainik Gomantak
गोवा

परशुरामाच्या रुपाची माटोळी सजावट अव्वल, देखावा स्‍पर्धेत ब्रह्मेश्‍वर युवक संघ प्रथम; वाचा दोन्ही निकाल सविस्तर

Goa state level matoli and decoration competition: राज्‍यस्‍तरीय स्‍पर्धा : कोरगाव गणेशोत्सव मंडळ द्वितीय, गोलवाडा मंडळ तृतीय

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कला आणि संस्कृती संचालनालयाने गणेश चतुर्थीनिमित्त आयोजित केलेल्‍या राज्यस्तरीय देखावा स्‍पर्धेत प्रथम क्रमांकाचे ३५ हजार रुपयांचे पारितोषिक आखाडा-सांतइस्तेव येथील ब्रह्मेश्‍वर युवक संघाने पटकावले. या स्पर्धेत एकूण १८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता.

द्वितीय पारितोषिक कोरगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तर तृतीय पारितोषिक गोलवाडा-कुंभारजुवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाला प्राप्‍त झाले. चौथे पारितोषिक मधलावाडा-हरमल सार्वजिक गणेशोत्सव मंडळाला तर पाचवे पारितोषिक श्री शांतादुर्गा कला आणि क्रीडा संघ वास्को यांना मिळाले.

उत्तेजनार्थ बक्षिसे अनुक्रमे युवा पणजी मळा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तुडव-नेत्रावळी, श्री बालगणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काजूर-केपे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुसमाने-केपे, श्री राम मंदिर देवस्थान समिती रामभुवनवाडा-कुंभारजुवा यांना मिळाली. त्‍यांना प्रत्‍येकी १० हजार रुपये व प्रशस्‍तिपत्रक देण्यात येईल. स्पर्धेचे परीक्षण नागेश देसाई, सचिन नाईक आणि भिसाजी गडकरी यांनी केले

माटोळी सजावट स्‍पर्धेत दत्ता नाईक प्रथम

माटोळी स्पर्धेत एकूण १३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रथम २० हजाराचे पारितोषिक दत्ता शंभू नाईक (गावठण-प्रियोळ) यांना मिळाले. द्वितीय बक्षीस तानाजी गावडे (बांदोडा), तृतीय देऊ सत्यवान शेटकर (धारबांदोडा), चतुर्थ तृप्ती पालकर (सावर्डे) तर पाचवे बक्षीस श्रीकांत सतरकर (कुर्टी) यांना प्राप्‍त झाली.

उत्तेजनार्थ पारितोषिके विशांत गावडे (कुर्टी), रंगनाथ गावकर (वांयगिणी-मये), रमाकांत गावकर (बेतोडा), शिवराज वझरकर (बांबर-नानोडा), विठोबा गावडे (वेलिंग) यांना जाहीर झाली आहेत. परीक्षण राजेंद्र केरकर, गोपीनाथ गावस, दीपक गाड यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT