Kumbharjuve Sangod Dainik Gomantak
गोवा

Sangod Utsav 2023 : गणपती विसर्जनाचा गोव्यातील अनोखा 'सांगोड उत्सव', आमदार फळदेसाईंना सतावतेय वेगळी खंत

Vinayak Samant

गोमंतकातील ‘चवथ’ ही वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे. गणरायाच्या डोक्यावर नानाविध प्रकारच्या वनौषधी फळाफुलांनी सजलेली माटोळी किवा घराघरातून ऐकू येणाऱ्या घुमटांच्या आरत्या या गणेशोत्सवाला खास करतात. गोमंतकीय नेहमीच हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करीत असतो.

त्याचप्रमाणे राज्यात गणेश विसर्जनाचेही वैशिष्ट्ये आहेत. कुंभारजुवे या गावात गणेश विसर्जनाची एक विशेष परंपरा पाहायला मिळते ज्याला ‘सांगोड उत्सव’ असे म्हणतात. यावेळी सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन असते. त्यातील विशेषता म्हणजे फुलांनी सजविलेला ‘सांगोड’

दोन होड्या एकत्र करून त्यावर लाकडी फळ्या वापरुन तराफा तयार केला जातो. मग चहोबाजूनी त्या तरफ्याला बांबू बांधून मंडपाचा आकार देतात आणि रंगेबिरंगी फुलांनी सजवितात. त्यालाच ‘सांगोड’ असे म्हटले जाते.

या फुलांनी सजविलेल्या प्रमुख मानाच्या ‘सांगोड’ वर देवी श्री शांतादुर्गेच्या मंदिरातील गणेशमूर्ती असते. गणेशमूर्तीसोबत देवस्थान पदाधिकारी आणि वेताळ, ऋद्धि-सिद्धी, नरकासुर यांची वेशभूषा केलेले लोक असतात. नदीच्या पत्रात जवळपास सात वेळा चक्कर मारून झाल्यावर त्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

पुर्वी मानाच्या सांगोड सोबत अजून एखादा सांगोड असायचा. परंतु कालांतराने त्याला मोठ्या उत्सवाचे आणि स्पर्धेचे स्वरूप आले आहे. जवळपासच्या परिसरातील १५ - १६ सांगोड या स्पर्धेत सहभागी होतात. यामध्ये प्रत्येक सांगोडवर ऐतीहासिक किंवा पौराणिक कथेवर आधारीत सजीव देखावे साकारले जातात.

हा उत्सव पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसह राज्यभरातील लोक उपस्थिती लावतात.

सुमारे २५ वर्षांपासून मी या सांगोड उत्सवात सहभागी होत आहे. ऐवढेच नव्हे तर आमदार होण्याआधी प्रत्येक सांगोड उत्सवला मी कुठलीही एक वेशभूषा करून सांगोडवर देखाव्यात भाग घ्यायचो. पण आता आमदार झाल्यानंतर हे सगळे करता येत नाही यांची खंत वाटते. परंतु जर संधि मिळाली तर अजूनही सांगोडवर सहभागी व्हायला आवडेल.
राजेश फळदेसाई, आमदार, कुंभारजुवे
गेल्या ५६ वर्षात या सांगोड उत्सवाचे बदलते स्वरूप मी बघत आलो आहे. लहानपणी या सांगोड उत्सवात वयोवृद्ध मंडळी लहान मुलांना सहभागी व्हायला देत नसत कारण हा उत्सव नदीच्या पात्रात होत असल्याने लहान मुलांना परवानगी नसायची. तेव्हा एवढी गर्दीसुद्धा होत नसत. परंतु आता राज्यभरातून असंख्य लोक हा उत्सव बघायला मुद्दाम येतात. पुर्वी एवढे सांगोड नसायचे परंतु आता त्यांची संख्यादेखील वाढली आहे
मुराली तारी, कुंभारजुवे ग्रामस्थ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT