Water Conservation Gomantak Digital Team
गोवा

Goa Water Conservation : पावसाचे पाणी साठविण्‍यासाठी विद्यालयांना प्रोत्‍साहित करणार

राज्‍यातील सर्व शैक्षणिक संस्थांना पावसाचे पाणी संवर्धन करण्यास जलस्रोत खात्याचा पुढाकार

गोमन्तक डिजिटल टीम

राज्‍यातील सर्व शैक्षणिक संस्थांना पावसाचे पाणी संवर्धन करण्यास जलस्त्रोत खाते भाग पाडेल. यापुढे खाते जलसंवर्धनासाठी जनतेत अधिक जागरूकता करेल, असे जलस्रोत खात्याचे जनसंपर्क अधिकारी नाझारेथ वाझ यांनी सांगितले.

नाझारेथ वाझ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात एकूण पाच महाविद्यालयीन संस्था आहेत, ज्या पावसाच्या पाण्याचे संवर्धन करत आहेत. गेली काही वर्षे या संस्थांच्‍या उपक्रमांना यश आल्यामुळे यापुढे आम्ही सर्व शैक्षणिक संस्थांना पाणी संवर्धनाविषयी प्रोत्साहित करणार आहोत. खात्याने जलसंवर्धनासाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत, ज्यात शेतकरी वर्ग, ग्रामीण भागातील जलस्त्रोत, विहिरींतील गाळ उपसून नवसंजीवनी देण्यासाठी आर्थिक मदतही करत आहे.

गोव्‍याला मोठी किनारपट्टी लाभली आहे. दरवर्षी राज्‍यात मुबलक पाऊस पडतो. मात्र पावसाचे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. गेली अनेक वर्षे गोव्यात पाणीटंचाई जाणवतेय. त्यामुळे जलस्त्रोत खात्याने यंदापासून जलसंवर्धनावर अधिक भर दिलाय.

नाझारेथ वाझ, जलस्रोत खात्याचे जनसंपर्क अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT