Shri Anant Devasthan, Savoi Verem  Dainik Gomantak
गोवा

Goa Heritage: मुस्लिम व्यापाऱ्याच्या होडीत सापडली पाषाणमूर्ती, 400 वर्षांचा इतिहास आणि तलावावर बांधलेले गोव्यातील एकमेव मंदिर

Vinayak Samant

Goa Heritage: ४५० वर्षे पोर्तुगीज राजवट गोव्यामध्ये राहूनदेखील गोव्याची संस्कृती अबाधित राहिली आहे. इथे सर्व धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदाने एकत्र राहताना दिसतात.

इथली प्राचीन देवालये आणि त्यांचा इतिहास नेहमीच अचंबित करणारा असतो. असेच एक प्राचीन मंदिर फोंडा तालुक्यात आहे.

राज्यातील एकमेव असे श्री अनंत देवस्थान फोंडा तालुक्यातील सावई-वेरे गावात आहे. विशेष म्हणजे या मंदिरात असलेली श्री अनंताची पाषाणमूर्ती ४०० वर्षांपूर्वी एका मुस्लिम व्यापऱ्याच्या होडीत सापडली.

त्यानंतर ती पाषाणावर कोरलेली मूर्ती आणून एका तलावावर मंदिर बांधण्यात आले. श्री अनंताचे स्थान पाण्यात असते म्हणून हे देवस्थान तलावावर बांधण्यात आले.

जवळपास ४०० वर्षांपूर्वी सावई-वेरे येथील नदीकाठी श्री अनंताची पाषाणमूर्ती असल्याचा दृष्टान्त तेथील एका गृहस्थाला झाला. सुरवातीला दुर्लक्ष केल्यानंतर सतत होत असलेल्या दृष्टांन्तामुळे त्याने याचा शोध घेण्याचे ठरविले.

शोधाशोध केल्यावर नदीच्या पलीकडे त्यांना एकमात्र होडी दिसली. नदीपलिकडच्या सुर्ल गावातील एका मुस्लिम व्यापऱ्याची ती होडी होती.

त्यानानंतर गावकऱ्यांसोबत ते गृहस्थ नदी ओलांडून त्या मुस्लिम बांधावाच्या घरी आले. त्यांनी त्याला श्री अनंताची पाषाणमूर्ती देण्याची विनंती केल्यावर आपण मुस्लिम असून आम्ही मूर्तिपूजा करीत नाही तेव्हा आपल्याकडे मूर्ती नाहीये पण खात्री करून घेण्यासाठी तुम्ही होडीमध्ये जाऊन पाहू शकता असे सांगितले.

गावकऱ्यांनी त्या इसमाच्या होडीमध्ये शोधूनसुद्धा त्यांचा हाती काहीच लागले नाही. शेवटी होडीतून उतरताना एका व्यक्तीची नजर कोपऱ्यात उभ्या असलेल्या पाषणावर पडली. मुस्लिम व्यापऱ्याने ते पाषाण आपल्या होडीचा तोल सावरण्यासाठी ठेवले होते. जेव्हा पाषाण उलटून पाहिले तेव्हा त्यावर शेषनागावर शयनावस्थेत असलेली श्री अनंताची मूर्ती सापडली.

नंतर गावकऱ्यांनी मंदिर होईपर्यंत गावातील कुळागारात एका खड्डयात पाणी घालून ती मूर्ती ठेवण्यात आली. मंदिर बांधून पुर्ण झाल्यावर विधीवत त्या पाषाणमूर्तीची स्थापना केली गेली. हे मंदिर चहोबाजूनी पाण्यात आहे. त्याच्या एकाबाजूला तळी असून मंदिराच्या खांबावर छान कोरीव काम केले गेलेले आहे.

तेथील एक घंटेवर ई.स. १७९१ मध्ये जे. वॉर्नर अँड सन्स असे लिहिलेले आढळून येते. सभागृहातील प्रत्येक खांबावर पौराणिक काळातील गोष्टींचे कोरीव काम केले आहे. तिथे असलेल्या सहा खांबांपैकी एकाला चांदीचे वलय दिलेले आहे. कालांतराने मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली असली तरी मंदिरात उभ्या असलेल्या या कोरीव लाकडी खांबावरून दिसून येते की ही वास्तु किती पुरातन आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT