Animal Ambulance  Dainik Gomantak
गोवा

Department of Animal Husbandry पशुपालकांसाठी महत्वाची बातमी; मुख्यमंत्री पशु सेवा योजनेअंतर्गत रुग्णवाहिका सेवा सुरू

Department of Animal Husbandry पशु आरोग्य सेवेत मोठं पाऊल; 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध होणार

Ganeshprasad Gogate

Department of Animal Husbandry: राज्यातील पशुपालकांसाठी महत्वाची बातमी हाती येतेय. जखमी तसेच आजारी असलेल्या पशूंच्या वैद्यकीय सेवेसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री पशु सेवा योजनेंतर्गत 24 तास सेवा देणारी पशु रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेत यामध्ये फिरती रुग्णालये तसेच दुचाकी रुग्णवाहिकांचा समावेश केला आहे. सदरच्या सेवेसाठी पशुपालकांना 200 ते 500 पर्यत सेवाशुल्क मोजावे लागणार असून भटक्या जनावरांसाठी ही सेवा मोफत पुरवली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पशुसंवर्धन खात्याने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार ही सेवा पुरविणाऱ्या संस्थेला सहाय्यता निधी देण्यात येणार आहे.

यानुसार 3 रुग्णवाहिकांसाठी 69 लाख, अन्य साहित्यासाठी 9 लाख, 3 दुचाकी रुग्ण वाहिकांसाठी 3 लाख तर दुचाकी कॉल सेंटरसाठी 21 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. ही सेवा देणाऱ्या संस्थेला सरकारकडून एका वर्षासाठी 1 कोटी 98 लाख रुपयांचे सहाय्य देण्यात येणार आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्यातील पशुपालकांना गाई-गुरांना लागण होत असलेल्या लम्पी आजाराचा धोका होता. यावेळी पशुसंवर्धन खात्याकडून सुरक्षेच्या उपायांसहित आवश्यक ते औषधोपचार पुरवण्याचा प्रयत्न केला गेला होता.

आता शासनाच्या या योजनेमुळे पशुपालकांना आधार मिळणार असून उपचाराअभावी जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होणार असल्याचे बोलले जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT