Goa MP Francisco Sardinha Dainik Gomantak
गोवा

Goa: नोकऱ्या देताना जुन्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नका; खासदार 'फ्रान्सिस सार्दीन'

कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नका अशी मागणी दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी केली.

दैनिक गोमन्तक

मडगाव : आता निवडणूक तोंडावर आली असताना गोवा राज्य सरकारने (Goa state government) नोकरभरती (started recruitment) सुरू केली आहे. बेकार युवकांना (unemployed youth) जर खरंच नोकऱ्या मिळत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. मात्र नव्या युवकांना नोकऱ्या देताना सरकारी सेवेत कंत्राटी पद्धतीने जे काम करतात त्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नका अशी मागणी दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दीन (South Goa MP Francisco Sardinha) यांनी केली.

आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, गोव्यात कित्येक सरकारी कर्मचारी आहेत हे 5 वर्षांपेक्षा अधिक काळ कंत्राटी पद्धतीवर काम करतात, त्या सर्व कर्मचऱ्याना आधी सेवेत कायम करा आणि नंतरच नवीन नोकरभरती करा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली. ते म्हणाले, मी ही यापूर्वी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मी अशा कर्मचऱ्यांना कायम केले होते. जर तसे न करता नवीन नोकरभरती केली तर जुन्या कर्मचाऱ्यांवर तो अन्याय होईल.

गोव्यातील भाजप सरकार लोकांना केवळ आश्वासने देऊन झुलवत ठेवते असा आरोप करीत सध्या पगार न दिल्याने संजीवनी कारखान्याचे कामगार संपावर गेले आहेत. त्यांना चतुर्थीपुर्वी पगार द्या आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाईही वेळेवर द्या अशी मागणी केली. कोविडच्या काळात रोजगारापासून वंचित झाले अशासाठी सरकारने 5 हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून अर्ज घेतले होते. मात्र हेही पैसे अजून त्यांना मिळालेले नाहीत. हे पैसेही त्वरित द्यावेत. अलीकडे आलेल्या पुरात ज्यांची घरे जमीनदोस्त झाली त्यांना घरे पुन्हा उभारण्यासाठी सरकारने लवकर आर्थिक मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT