Dainik Gomantak Dainik Gomantak
गोवा

Subhash Phaldesai : स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना नोकरी

आश्‍वासनाची पूर्तता : फळदेसाईंच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

गोमन्तक डिजिटल टीम

Subhash Phaldesai : स्वातंत्र्यसैनिकांच्या उर्वरित वारसांना सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घेणार असल्याचे सरकारतर्फे वारंवार सांगितले गेले होते; परंतु सर्वांना एकाचवेळी सरकारी सेवेत सामावून घेता आले नाही. आता त्यांचा नोकरीतील कोटा भरून काढण्यासाठी कार्यवाही सुरवात झाली आहे. समाजकल्याण खात्यातर्फे तीन वारसांना फिल्ड वर्कर म्हणून नियुक्तीपत्रे देण्यात आली.

समाजकल्याण संचालनालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमास मंत्री सुभाष फळदेसाई, खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांच्यासह इतर अधिकारी वर्ग, कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी जतू कुंडईकर (करमळी-तिसवाडी), यमुना नाईक (आडपई-दुर्भाट), नामदेव च्यारी (पार्से-पेडणे) यांना मंत्री फळदेसाई यांनी नियुक्तीपत्रे प्रदान केली.

मंत्री फळदेसाई म्हणाले, गोवा मुक्तीमध्ये स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले योगदान विसरता कामा नये. स्वातंत्र्यसैनिकांच्या उर्वरित वारसांना सरकारी सेवेत घेण्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती होत आहे. समाजकल्याण खात्याने तीन वारसांना आपल्या सेवेत सामावून घेतले आहे.

काही वारसांचे वय पाहता त्यांना सेवेत सामावून घेणे अत्यंत जरूरीचे होते. एकदा वयाची मर्यादा ओलांडली तर त्यांना सेवेत घेणे अवघड झाले असते. त्यांची जेवढी सेवा होणार आहे, त्याचा त्यांना निवृत्तीनंतर फायदा होणार आहे. याप्रसंगी संचालक पंचवाडकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

पर्वरी येथील राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या सिडनी डिसोझा या दिव्यांग विद्यार्थ्याच्या कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत द्यावी म्हणून विविध पक्षांकडून व सामाजिक संघटनांकडून मागणी होऊ लागली आहे.

त्याबाबत विचारणा केली असता मंत्री फळदेसाई म्हणाले, त्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याविषयी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.

मागणी पूर्ण होणार

पर्वरी येथील गोवा हाउसिंग बोर्डाच्या इमारतीतील जागेचा ताबा समाजकल्याण खात्याला मिळाला आहे. परंतु त्याठिकाणी सुविधा निर्माण करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच समाजकल्याण संचालनालयाचे पणजीतील कार्यालय तेथे स्थलांतरित करण्यात येणार आहे.

अनेक वर्षांपासून येथील कर्मचाऱ्यांची चांगल्या जागेची मागणी होत होती, ती मागणी या सरकारच्या काळात पूर्ण होत असल्याचेही मंत्री फळदेसाई यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT