Goa Mock Drill Dainik Gomantak
गोवा

Goa Mock Drill: है तैयार हम! चक्रीवादळासह कोणतीही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी गोव्यात विविध ठिकाणी पार पडले मॉक ड्रिल

State-Level Disaster Management Drill: गोव्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने राज्यस्तरीय मॉक एक्सरसाइजचे आयोजन केले. या एक्सरसाइजमध्ये राज्यात चक्रीवादळासह इतर नैसर्गिक आपत्तीसंबंधी प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

Manish Jadhav

पणजी: गोव्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने राज्यस्तरीय मॉक एक्सरसाइजचे आयोजन केले. या एक्सरसाइजमध्ये राज्यात चक्रीवादळासह इतर नैसर्गिक आपत्तीसंबंधी प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुरगाव पोर्ट, गोवा शिपयार्ड, बायना, फोंड्यासह नाकेरी-बेतूल इत्यादी ठिकाणी या मॉक एक्सरसाइजचे आयोजन करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमधून लोकांची सुरक्षित सुटका करण्यासोबत आरोग्य सेवा, संवाद यंत्रणा आणि प्रशासनाची तयारी कशी सुरु आहे हे या मॉक एक्सरसाइजमधून दाखवण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा

दरम्यान, या मॉक एक्सरसाइजमध्ये राज्यातील विविध आपत्ती व्यवस्थापन विभाग, आपत्कालीन सेवा, आणि प्रशासन यांचा सहभाग होता. या एक्सरसाइजमध्ये विविध आपत्तींवर तात्काळ प्रतिसाद देण्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला, ज्यामध्ये चक्रीवादळ, पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तीमधून (Natural Disaster) लोकांची तात्काळ सुटका करण्यासोबत त्यांच्यापर्यंत आवश्यक मदत कशी पोहोचवता येणार हे दाखवण्यात आले.

मॉक एक्सरसाइजचे उद्दिष्ट काय?

तसेच, चक्रीवादळासारख्या आपत्तींवर तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सर्व संबंधित विभागांची क्षमता तपासणे, आपत्ती निवारणासाठी राज्यस्तरीय आणि स्थानिक पातळीवरील समन्वयाची क्षमता वाढवणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर काम करण्याची तयारी सुनिश्चित करणे हे या मॉक एक्सरसाइजचे उद्दिष्ट होते.

नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीने प्रतिसाद देणे

नैसर्गिक आपत्तींमध्ये तातडीने प्रतिसाद देणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकत्र येऊन तत्परतेने निर्णय घेऊन कार्यवाही करतील याची खात्री मॉक एक्सरसाइजने दिली. अशाप्रकारे भविष्यात गोवा राज्य अधिक सक्षम होईल, जेव्हा कोणत्याही प्रकारच्या आपत्तीचा सामना करण्याची वेळ येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT