पणजी: गोवा राज्यात सध्या एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी दिली आहे. त्यांनी नागरिकांना घाबरून न जाता, पावसाळ्यात सामान्यपणे उद्भवणाऱ्या आजारांप्रमाणेच खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
सध्या राज्यात कोरोना रुग्ण आढळलेले नाहीत, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. साध्या पावसाळ्यात थंडी, ताप, खोकला यांसारखे त्रास होणे स्वाभाविक आहे. यावर उपचार सहजपणे होतात. त्यामुळे अशा लक्षणांवरही योग्य ती वैद्यकीय मदत घेण्याची गरज आहे, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
जरी सध्या परिस्थिती नियंत्रणात असली, तरी जर एकाच वेळी १० कोरोना रुग्णांची नोंद देखील झाली, तरी त्यांच्यावर तत्काळ उपचार करता येतील, यासाठी आमच्याकडे आवश्यक मनुष्यबळ, सुविधा आणि औषधोपचार उपलब्ध आहेत. आमची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, असेही डॉ. पाटील यांनी ठामपणे सांगितले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय किंवा आरोग्य खात्याकडून सध्या कोरोनासंदर्भात कोणतीही विशेष सूचना जारी करण्यात आलेली नाही.
मात्र, पावसाळ्यात होणाऱ्या अन्य संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत.
डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीही आम्ही तयारी सुरू केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.