Goa Startup Yatra Dainik Gomantak
गोवा

Goa Startup Yatra: ‘गोवा स्टार्टअप यात्रा’ला सोमवारपासून सुरवात

स्टार्टअप, आयटी प्रोत्साहन विभागाचा उपक्रम

दैनिक गोमन्तक

Goa Startup Yatra: सरकारच्या स्टार्टअप आणि आयटी प्रोत्साहन विभागाकडून स्टार्टअप यात्रेला सोमवार, ४ रोजीपासून सुरवात होणार आहे. स्टार्टअप संस्थांना प्रोत्साहन देणे, उद्योजकता वाढविणे आणि बुद्धी कौशल्याला प्रोत्साहन देणे हा यामागील उद्देश आहे.

राज्यात ४ सप्टेंबर ते १३ ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनाच्या टप्प्यात राज्यातील ३०हून अधिक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये सखोल अभ्यासकांच्या उद्योजकता कार्यशाळांचा समावेश आहे. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये तेजस्वी विद्यार्थी व्यासपीठ कार्यक्रम होणार आहे. हे शिबिर प्रत्येक संस्थेतील दोन उत्कृष्ट विद्यार्थी किंवा गट निवडतील.

यानंतर नामांकित नेटवर्क इनक्यूबेटर्सकडून एक वर्षापर्यंत उष्मायन समर्थन प्राप्त होईल. त्यांना मार्गदर्शन आणि त्यांच्या वाढीस सुलभ करणाऱ्या संसाधनांचा फायदा होईल. यात राज्यातील अनेक इनक्यूबेटर्सचा समावेश आहे. गोवा स्टार्टअप यात्रा २.० चे अनावरण हे राज्यातील उद्योजकता आणि नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आहे, असे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT