Goa Casino Culture: कॅसिनो संस्कृतीच्या अधिमान्यतेमुळेच वासनांधतेचा उद्रेक

डॉ. नंदकुमार कामत शोषणाची प्रकरणे उघडकीस येऊनही समाज थंड; नीतिमत्ता गेली रसातळाला
Crime is on the rise due to the acceptance of casino culture
Crime is on the rise due to the acceptance of casino cultureDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Casino Culture: कॅसिनो म्हणजेच जुगाराला महसुलासाठी अधिमान्यता दिल्यानंतर समाजाचे नैतिक अधःपतन होणे ठरून गेलेले होते. त्याचे दृश्य परिणाम आता दिसून येत आहेत. कोणी कोणाची छेड काढली, विनयभंग केला, बलात्काराचा प्रयत्न केला, बलात्कार केला अशा घटना केवळ बातम्यांपुरत्या मर्यादित राहणार आहेत.

Crime is on the rise due to the acceptance of casino culture
Goa Crime News: जामिनावर सुटून बाहेर येताच सादिक बेळ्ळारीचा काढला काटा...

काही वर्षांपूर्वी तत्कालीन सभापती दयानंद नार्वेकर यांनी केलेल्या कथित विनयभंग प्रकरणामुळे समाजमन पेटून उठले होते, तशा प्रकाराविरोधात मोहीम सुरू झाली होती. आता दररोज अशी प्रकरणे उघडकीस येऊनही समाज थंड झाला आहे; कारण त्यांच्यासभोवतालचे वातावरणच वासनेने बरबटलेले आहे, असे निरीक्षण डॉ. नंदकुमार कामत यांनी ‘दै. गोमन्तक’शी बोलताना नोंदवले.

नीतिमत्ता रसातळाला पोचली आहे. या साऱ्यावर उपाय म्हणजे २०२७ पूर्वी राज्यातील कॅसिनो आम्ही बंद करणार, असे सरकारला ठरवावे लागेल. देशात दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरदेखील अनेक राज्ये आहेत; पण महसुलासाठी त्यांनी आपल्या राज्यात कॅसिनो सुरू केलेले नाहीत.

कारण कॅसिनो संस्कृती कधी एकटी नसते. त्याच्यासोबत वेश्याव्यवसाय, बाललैंगिकता, समलैंगिकता, अमली पदार्थ, गुन्हेगारी हे सारे येते. आपल्याकडेही हेच दिसत आहे. त्यामुळे असे प्रकार फोफावण्याचे कारण सरकारने शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा सरळ कॅसिनो बंद करावेत. त्यांच्याविरोधात आवाज करून बिगर सरकारी संस्था थकल्या आहेत, असे डॉ. कामत यांनी सांगितले.

विद्यालयांत याचे लोण पोचले हेही काही नवीन नव्हे. गोवा विद्यापीठातही असे प्रकार तोंड दाबून अनेक विद्यार्थिनींनी सहन केले आहेत. आजही बसमध्ये, बाजारात, बसथांब्यावर मुली, महिलांना जे काही लज्जास्पद अनुभव येतात, ते त्या घरीही सांगू शकत नाहीत एवढे घृणास्पद असतात. दररोज घराबाहेर पडणारी स्त्री आज सुरक्षित नाही. तिच्यावर केवळ शारीरिक अत्याचारच होण्याची गरज नसते, वासनांध नजरेने न्याहाळणाऱ्यांची आज कमी नाही.

कॅसिनो संस्कृतीत वासनांधतेला प्रतिष्ठा मिळत गेली आहे. त्यामुळे जे काही होत आहे ते वावगे आहे, हे समाजाला वाटतच नाही. मटका पणजीत सहाशे ठिकाणी घेतला जातो; पण त्यातून अशा प्रकारची अनैतिकता पसरत नाही. त्यामुळे याचे मूळ कॅसिनोच, हे मान्य करावेच लागेल, असे डॉ. कामत यांनी सांगितले.

निरीक्षणे अशी...

  1.   अनेक लैंगिक अत्याचाराची प्रकरणे लज्जेपोटी दडपली जातात

  2.   सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अनुभव शब्दबद्ध करणे कठीण

  3.   गर्भपाताच्या प्रकरणांत प्रचंड वाढ

  4.   बदलत्या सामाजिक आयामांना शिक्षकही बळी

  5.   चंगळवादाने घेतला गोमंतकीय संस्कृतीचा ताबा

  6.   पाश्‍चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण

  7.   कॅसिनो बंद करणे हाच एकमेव उपाय

  8.   कॅसिनोंसोबत गुन्हेगारी, वेशाव्यवसाय आणि अमलीपदार्थ येतात

  9.   नैतिकतेची व्याखा बदलत चालली आहे

  10.   घराबाहेर पडणारी स्‍त्री असुरक्षित

  11.   गोवा विद्यापीठातही अनेक प्रकार घडले होते

Crime is on the rise due to the acceptance of casino culture
Goa Illegal Mining: बेकायदा चिरेखाणीवर मये येथे छापा, चारजणांना अटक...

डॉ. कामत म्हणाले...

  • भू महसूल जमा करणे सरकारने बंद केले आहे. त्याकडे बघण्यास सरकारला वेळ नाही. महसुलासाठी कॅसिनोंचे समर्थन करणारे नैतिकतेच्या गोष्टीच करू शकत नाहीत.

  • आता विशाखा समित्या स्थापन झाल्या आहेत. समाजमाध्यमांची चलती आहे म्हणून अशी प्रकरणे उघडकीस येत आहेत. मात्र, त्यात नवे असे काही नाही.

  • कॅसिनो संस्कृती येथे रुजल्यानंतर असे प्रकार वाढीस लागण्यात आश्चर्य नाही. चंगळवादी संस्कृती ही गोमंतकीय संस्कृतीपेक्षा शिरजोर ठरली आहे. पापपुण्याची संकल्पना जणू हद्दपार झाली आहे.

  • देहप्रदर्शन आणि अन्य प्रदर्शनातून वासना चाळवल्या जात असतील तर त्याला बळी पडणाऱ्यांचा तरी काय दोष. ३३ वर्षांच्या महिलेशी २२ वर्षांच्या मुलाचे संबंध होते, यात वावगे कसे कोणाला काही वाटत नाही. हे असेच चालणार असे समाजमनाने मानून घेतले आहे.

  • पाश्चिमात्य संस्कृतीचे राज्यात अंधानुकरण सुरू आहे. ९० टक्के नागरिकरण झालेल्या राज्यात त्याचे परिणाम अधिक ठळकपणे जाणवणे स्वाभाविकच आहे.

  • चंगळवादी संस्कृती आता हाताबाहेर गेली आहे. नैतिकता आणि अनैतिक यांच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत. आम्ही बालपणी, तरुणपणी अनुभवलेला गोवा हाच का, असा प्रश्न पडावा अशी भयावह परिस्थिती सभोवताली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com