Goa Star Awards Dainik Gomantak
गोवा

Goa Star Awards 2022: अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न

Panjim: श्रीपाद नाईक यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

दैनिक गोमन्तक

Panjim: भाजप सरकार अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आर्थिक समावेशनासह अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्यात येत आहे, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज सांगितले.

गोवा स्टार पुरस्कार 2022 (अनुसूचित जाती) या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विधानसभा सभापती रमेश तवडकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

श्रीपाद नाईक यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले पुरस्कार म्हणजे केलेल्या कार्याचे कौतुक असून समाजासाठी काही भले काम करु इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणा ठरते. समाजातील सर्व घटकांचा विकास आणि कल्याण म्हणजेच देशाचा विकास आहे.

याप्रसंगी रिबिल्ड इंडिया ट्रस्ट आणि अनुसूचित जाती कल्याण संघटना यांच्या आगामी काळातील कृती आराखड्याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावर्षी अभियांत्रिकी, शिक्षण, समाज सेवा, कला आणि संस्कृती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले.

दरम्यान, गोवा स्टार पुरस्काराचे अनुसूचित जाती आयोजन रिबिल्ड इंडिया ट्रस्ट आणि अनुसूचित जाती कल्याण संघटनेने संयुक्तरित्या केले होते. अनुसूचित जातीतील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींचा संस्थेकडून मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT