Goa Staff Selection Commission recruitment Dainik Gomantak
गोवा

Goa Govt Jobs: गोव्यात 709 पदांची मेगा भरती! 16 मेपासून सीबीटी परीक्षा; पोलिस खात्यात 596 जागा

Goa Staff Selection Commission recruitment: गोवा कर्मचारी निवड आयोगाने विविध खात्यांतील ७०९ रिक्त पदांची भरती जाहीर केली असल्याने राज्यातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा कर्मचारी निवड आयोगाने विविध खात्यांतील ७०९ रिक्त पदांची भरती जाहीर केली असल्याने राज्यातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी पुढील महिन्यात १६ मे पासून या विविध पदांसाठी आयोगातर्फे टू-टीयर सीबीटी परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आयोगाने काढलेल्या या मेगा भरतीमध्ये सर्वाधिक ५९६ पदे ही पोलिस खात्यातील आहेत. आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या शिक्षकांसह इतर विविध पदांसाठी १० मे पासून परीक्षा सीबीटी-२ची परीक्षा होणार आहे.

आता ही दुसरी संधी युवकांसाठी आयोगाने उपलब्ध करून दिली असल्याने या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पोलिस खात्यातील हवालदारांची ३६० पदे भरली जाणार असून, त्यात ३०२ पुरूष आणि ५८ महिलांसाठी राखीव आहेत. त्याशिवाय सशस्त्र पोलिसांची ११९ पदे असून, पोलिस चालक (हवालदार) १११ पदे भरली जाणार आहेत.

ही भरती केवळ पोलिस खात्यापुरती मर्यादित नाही, तर वन विभाग व इतर विभागातील पदांचाही त्यात समावेश आहे. त्यात प्लाटून कमांडर (पुरुष) ४, राऊंड फॉरेस्टर २३, हवालदार (ग्रीझर)१, हवालदार (इलेक्ट्रिशियन) १, फॉरेस्ट गार्ड ९, सहायक अधीक्षक (पुरूष) ४, वार्डन (पुरूष) ६०, मेट्रोन १०, लास्कर ५ आणि एस्कॉर्ट (महिला) २ या एवढी रिक्त पदे भरली जाणार आहेत.

या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता व कौशल्यधारीत उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. टू टायर सीबीटी १ परीक्षा १६, १७, २४, ३० आणि ३१ रोजी होणार आहे.

ई- ॲडमिट कार्ड!

ई-ॲडमिट कार्ड ८ मे रोजी सीबीईएस पोर्टलवर उमेदवाराच्या लॉगीनमध्ये उपलब्ध होईल. परीक्षेचे ठिकाण व वेळ आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तसेच सीबीटी परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी आयोगाने केलेल्या सर्व सूचनांची अमलबजावणी करावी, असेही आयोगाने कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT