Nilesh Dhaigodkar Tribal Welfare Dainiak Gomantak
गोवा

Goa Tribal Welfare: गोव्यातील एसटी समाजाच्या विकासाला केंद्र सरकारची मोठी साथ; पायाभूत सुविधांसाठी मिळाला 20 कोटींचा बूस्ट

Nilesh Dhaigodkar Tribal Welfare: अनुसूचित जमातींच्‍या (एसटी) कल्‍याणासाठी तसेच त्‍यांच्‍या भागांमध्‍ये पायाभूत साधनसुविधा उभारण्‍यासाठी केंद्र सरकारने राज्‍याला २० कोटींचा निधी आगाऊ स्‍वरुपात दिलेला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: अनुसूचित जमातींच्‍या (एसटी) कल्‍याणासाठी तसेच त्‍यांच्‍या भागांमध्‍ये पायाभूत साधनसुविधा उभारण्‍यासाठी केंद्र सरकारने राज्‍याला २० कोटींचा निधी आगाऊ स्‍वरुपात दिलेला आहे. या निधीतून पैंगीण–काणकोण येथे उच्च माध्‍यमिकसाठी ब्‍लॉक उभारण्‍यात येणार असल्‍याची माहिती आदिवासी कल्‍याण खात्‍याचे संचालक नीलेश धायगोडकर यांनी गुरुवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

भारतीय संविधानातील कलम २७५(१) अंतर्गत एसटी समाजाचे कल्याण आणि अनुसूचित क्षेत्रातील प्रशासनाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना विशेष अनुदान दिले जाते. हा निधी शंभर टक्‍के केंद्र पुरस्कृत असतो आणि त्‍याचा वापर आदिवासी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केला जातो.

गोव्‍याला दरवर्षी या निधीतून आठ कोटी रुपये मिळत होते, परंतु यावेळी आदिवासी कल्‍याण खात्‍याने या निधीतून राज्‍याला ३६ कोटींचा निधी मिळावा असा प्रस्‍ताव सादर केलेला होता. त्‍यानुसार आदिवासी कल्‍याण मंत्रालयाने राज्‍याला दोन वर्षांसाठी २० कोटींचा आगाऊ निधी दिलेला असून त्‍यातूनच पैंगीण–काणकोण येथील उच्च माध्‍यमिक ब्‍लॉकची उभारणी करण्‍यात येईल, असे धायगोडकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT