Sub junior Ranking Badminton Competition  Dainik Gomantak
गोवा

‘आंतरराष्ट्रीय’ उन्नतीचा धक्कादायक पराभव

सबज्युनियर मानांकन बॅडमिंटन : आंध्रच्या नव्या कांदेरीचा सनसनाटी विजय

Kishor Petkar

पणजी : काही दिवसांपूर्वी गोव्यातच हरियानाची आंतरराष्ट्रीय खेळाडू उन्नती हुडा हिने अखिल भारतीय ज्युनियर (19 वर्षांखालील) मानांकन स्पर्धा जिंकली होती, पण गुरुवारी तिला अखिल भारतीय 17 वर्षांखालील मानांकन स्पर्धेच्या आरंभीच धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. आंध्र प्रदेशच्या नव्या कांदेरी हिने एक तास सोळा मिनिटांच्या संघर्षमय झुंजीनंतर सनसनाटी विजय नोंदविला.

नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत नव्या हिने तीन गेममध्ये 14-21, 22-20, 21-16 असा चमकदार विजय संपादन केला. यावर्षी जानेवारीत बीडब्ल्यूएफ सुपर 100 गटातील ओडिशा ओपन स्पर्धेत महिला एकेरी किताब जिंकून चौदा वर्षीय उन्नती प्रकाशझोतात आली होती.

स्पर्धेतील 15 वर्षांखालील वयोगटात उत्तराखंडच्या सूर्याक्ष रावत याने महाराष्ट्राच्या प्रणीत सोमानी याच्यावर 21-15, 21-23, 21-19 असा विजय नोंदविला. या वयोगटातील मुलींत महाराष्ट्राची अव्वल मानांकित नैशा कौर भाटोये हिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिला राजस्थानच्या पारुल चौधरी हिच्याविरुद्ध पुढे चाल मिळाली.

गोव्याच्या हर्ष मानेचा पराभव

17 वर्षांखालील मुलांतील अव्वल मानांकित राजस्थानचा संस्कार सारस्वत याने पुढील फेरीत जागा मिळविताना कर्नाटकच्या निकोलस नॅथन राज याला 21-18, 21-17 फरकाने हरविले. 15 वर्षांखालील मुलांत गोव्याच्या हर्ष माने याला आव्हान आटोपते घ्यावे लागले. तमिळनाडूच्या के. गोकुळ याने त्याच्यावर 21-12, 21-10 फरकाने विजय नोंदविला. कर्नाटकच्या तुषार सुवीर याने चौथा मानांकित उत्तराखंडचा ध्रुव नेगी याला परतीचे तिकीट काढायला लावताना 21-19, 21-10 असा विजय मिळविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT