Goa Sports Minister Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

राज्य सरकारचा क्रीडा संघटनांना ‘दे धक्का’

क्रीडासंहितेच्या अंमलबजावणीचे मंत्री गोविंद गावडे यांचे निर्देश

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यातील सर्व क्रीडा संघटनांना राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेतील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. त्यामुळे आता प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय क्रीडा संहितांच्या तुरतुदी लागू केल्यास राज्यातील अनेक संघटनांना घटनादुरुस्ती करून नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील, हे स्पष्ट झाले आहे.

दिल्लीच्या धर्तीवर राज्यात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे गोविंद गावडे यांनी आज सांगितले. ते म्हणाले, ‘क्रीडा विद्यापीठाची राज्याला गरज आहे. याद्वारे खेळाडूना खेळाचे शिक्षण मिळण्यास मदत होईल.’ शिवाय गोव्यात नियोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये गुजरातमध्ये होईल आणि पुढील वर्षी गोव्यात आयोजित करण्याचे नियोजन भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आखल्याचे त्यांनी सांगितले.

‘आयओए’चा गोवा असोसिएशनला कडक इशारा

इंडियन ऑलिंपिक संघटनेचे प्रभारी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी ‘जीओए’ला पत्र पाठविले आहे. त्यानुसार जुन्या घटनेसह कार्यरत असलेल्या जीओएच्या नव्या कार्यकारी समितीस आयओए मान्यता देणार नाही आणि त्यामुळे जीओए आपला निवडणूक हक्कही गमावून बसेल ही बाब स्पष्ट आहे. अनिल खन्ना यांनी सर्व संलग्न राज्य ऑलिंपिक संघटनांना पत्र पाठविले आहे.

..तर श्रीपाद नाईक, चर्चिल आलेमावही ठरणार अपात्र

राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेतील तरतुदीनुसार राज्य क्रीडा संघटनेच्या पदाधिकारी 70 पेक्षा जास्त वयाचा असू शकणार नाही, तर संघटनेने 12 वर्षे पूर्ण केलेला पदाधिकारी राहू शकणार नाही. गोवा ऑलिंपिक असोसिएशनने हल्लीच राष्ट्रीय क्रीडा विकाससंहितेतील तरतुदींना फाटा देत निवडणूक घेतली व त्यांची कार्यकारी समिती बिनविरोध ठरली. या संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक येत्या 4 ऑक्टोबरला वयाची 70 वर्षे पूर्ण करतील. गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव 73 वर्षांचे आहेत. सरकारने राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेची गोव्यात अंमलबजावणी सक्तीची केल्यास आलेमाव पुन्हा जीएफए अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत. तसेच जीओए सचिव गुरुदत्त भक्ता यांनी खजिनदार-सचिव या दोन्ही पदावर मिळून १२ वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याने ते ही अपात्र ठरतील.

केवळ गोवा ऑलिंपिक संघटना नव्हे, तर राज्यातील जवळपास सर्वच क्रीडा संघटना राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेला फाटा देत निवडणूक प्रक्रिया घेत आहेत. या संघटनांनाही घटनादुरुस्तीसह नव्याने निवडणूक घ्यावी लागेल.

गोव्यात पुढील वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होतील. यासंदर्भात आपल्याला संबधितांकडून ई-मेल आलेला आहे, अशी माहिती गावडे यांनी दिली. यावर्षी डिसेंबरपर्यंत या स्पर्धेसाठी गोवा पूर्ण सज्ज असेल, अशी माहिती गावडे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT