Table Tennis Tournament Dainik Gomantak
गोवा

Table Tennis Tournament: ॲरन, प्रज्ञा, चंदनचे ‘दुहेरी’ यश

Table Tennis Tournament: अरविंद, पृथा एकेरीत जेते

किशोर पेटकर

Table Tennis Tournament: अखिल गोवा राज्य प्रमुख मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत ॲरन फारियास, चंदन कारे व प्रज्ञा कारे यांनी दुहेरी किताब पटकावला.

पुरुष एकेरीत अरविंद कुमार, तर महिला एकेरीत पृथा पर्रीकर यांनी विजेतेपद प्राप्त केले. स्पर्धा फातोर्डा येथील मल्टिपर्पज स्टेडियममध्ये झाली.

ॲरन याने १७ व १९ वर्षांखालील मुलांत, चंदनने १३ व १५ वर्षांखालील मुलांत, तर प्रज्ञा कारे हिने १५ व १७ वर्षांखालील मुलींत बाजी मारली.

११ वर्षांखालील वयोगटात रुहान शेख याने मुलांत, तर आयुषी आमोणकरने मुलींत विजेतेपद मिळविले. ईशिता कुलासो १३ वर्षांखालील, तर ऊर्वी सुर्लकर १९ वर्षांखालील मुलींत विजेती ठरली.

दक्षिण गोवा टेबल टेनिस परिषदेने गोवा टेबल टेनिस संघटना व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने स्पर्धा घेतली. विष्णू कोलवाळकर यांनी स्पर्धेत मुख्य रेफरीची जबाबदारी पेलली.

बक्षीस वितरण गोवा टेबल टेनिस संघटनेचे माजी अध्यक्ष व्हेरो नुनीस, सध्याचे अध्यक्ष सुदिन वेरेकर, सचिव ख्रिस्तोफर मिनेझिस, खजिनदार ऐश्वर्या नुनीस, संयुक्त सचिव नीलेश कीर्तनी, सदस्य अजित घाटकर व कबीर पिंटो मखिजा यांच्या उपस्थितीत झाले.

अंतिम निकाल

११ वर्षांखालील मुली: आयुषी आमोणकर वि. वि. गियाना जॉर्ज ३-० (११-३, ११-९, ११-६), मुलगे ः रुहान शेख वि. वि. युग प्रभू ३-१ (११-७, १६-१४, ११-१३, ११-४).

१३ वर्षांखालील मुली: ईशिता कुलासो वि. वि. आयुषी आमोणकर ३-० (११-२, ११-२, ११-५), मुलगे ः चंदन कारे वि. वि. ध्रुव कामत ३-१ (११-६, ११-२, १०-१२, ११-८).

१५ वर्षांखालील मुली: प्रज्ञा कारे वि. वि. नीझा कामत ३-० (१३-११, ११-९, ११-६), मुलगे ः चंदन कारे वि. वि. खुशाल नाईक ३-२ (११-८, ११-६, ८-११, ९-११, ११-५). १७ वर्षांखालील ः मुली ः प्रज्ञा कारे वि. वि. ऊर्वी सुर्लकर ३-२ (९-११, १२-१०, ३-११, ११-८, ११-९), मुलगे ः ॲरन फारियास वि. वि. रिशान शेख ३-० (११-३, ११-३, ११-९).

१९ वर्षांखालील मुली: ऊर्वी सुर्लकर वि. वि. प्रज्ञा कारे ३-२ (११-९, ६-११, ८-११, ११-५, ११-८), मुलगे ः ॲरन फारियास वि. वि. रिशान शेख ३-१ (११-४, ११-८, १०-१२, ११-८).

महिला एकेरी ः पृथा पर्रीकर वि. वि. ईशिता कुलासो ३-० (११-४, १५-१३, ११-८), पुरुष एकेरी ः अरविंद कुमार वि. वि. ॲरन फारियास ४-१ (१२-१०, १७-१५, १२-१०, ४-११, ११-७).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT