Ranji Trophy Dainik Gomantak
गोवा

Ranji Trophy Cricket Tournament: घरच्या मैदानावर गोव्याचे भवितव्य गोलंदाजांच्या हाती

Ranji Trophy Cricket Tournament: 94 धावांच्या आव्हानासमोर पंजाब 2 बाद 15

किशोर पेटकर

Ranji Trophy Cricket Tournament: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एलिट क गटात पहिला विजय नोंदविण्यासाठी पंजाबला आणखी ७९ धावांची गरज असून त्यांच्या आठ विकेट बाकी आहेत. त्याचवेळी घरच्या मैदानावर गोव्याचे भवितव्य पूर्णतः गोलंदाजांच्या हाती आहे.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सामन्याच्या दोन दिवसांतच ३२ गडी बाद झाले. खेळपट्टीने गोलंदाजांना मदतीचा हात दिल्यामुळे पंजाबसाठी ९४ धावांचे लक्ष्य कठीण ठरू शकते.

शनिवारी दुसऱ्या दिवसअखेर त्यांनी दोन्ही सलामीवीरांना गमावून १५ धावा केल्या होत्या. पंजाबचा त्यांच्या अनुभवी फलंदाजांवर भरवसा राहील.

त्यापूर्वी ८६ धावांच्या पिछाडीवरून गोव्याचा दुसरा डाव १७९ धावांत आटोपला. पहिल्या डावात त्यांनी १०४ धावा केल्यानंतर पंजाबने १९० धावांचे उत्तर दिले होते.

पायचीत निर्णयावर नाराज दिसलेला दीपराज गावकर याच्या ४६ धावा आणि पाच षटकार खेचलेल्या मोहित रेडकर याच्या ४४ धावांमुळे गोव्याला पंजाबसमोर किमान आव्हान उभे करता आले.

तिसराच रणजी सामना खेळणारा पंजाबचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रेरित दत्ता याने ४८ धावांत ५ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: १०४ व दुसरा डाव ः ४६.३ षटकांत सर्वबाद १७९ (ईशान गडेकर ३, सुयश प्रभुदेसाई २, के. व्ही. सिद्धार्थ २०, स्नेहल कवठणकर १६, राहुल त्रिपाठी १३, हेरंब परब ३, दर्शन मिसाळ ७, दीपराज गावकर ४६, अर्जुन तेंडुलकर १८, मोहित रेडकर ४४, विजेश प्रभुदेसाई नाबाद ०, प्रेरित दत्ता ५-४८, बलतेज सिंग २-३२, सिद्धार्थ कौल २-४८).

पंजाब, पहिला डाव (४ बाद ९४ वरुन): ६५ षटकांत सर्वबाद १९० (अनमोलप्रीत सिंग ६०, अभिनव शर्मा ३५, अर्जुन तेंडुलकर ७-०-३०-१, हेरंब परब १७-२-५३-१, विजेश प्रभुदेसाई १०-०-३९-०, दीपराज गावकर १३-२-३०-३, दर्शन मिसाळ १४-५-२१-२, मोहित रेडकर ४-१-१६-२) व दुसरा डाव ः ५.५ षटकांत २ बाद १५ (दर्शन मिसाळ १-१०, मोहित रेडकर १-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

SCROLL FOR NEXT