Manolo Marquez Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: खेळाडू बदलल्यानंतर नियंत्रण गमावले

Indian Super League: एफसी गोवाच्या पराभवावर प्रशिक्षक मार्केझ यांचे विश्लेषण

किशोर पेटकर

Indian Super League: संघ आघाडीवर असताना तासाभराचा खेळात बोर्हा हेर्रेरा याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि त्यानंतर एफसी गोवाने खेळावरील नियंत्रण गमावले.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवासाठी ते मुख्य कारण ठरले, असे या संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी कामगिरीचे विश्लेषण करताना नमूद केले

कोची येथे रविवारी रात्री एफसी गोवा संघाने पूर्वार्धात 2-0 अशी आघाडी घेतली. 59 व्या मिनिटास हेर्रेरा याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले तेव्हाही त्यांच्यापाशी २-१ अशी आघाडी होती.

मात्र अखेरच्या नऊ मिनिटांच्या खेळात एफसी गोवाने तीन गोल स्वीकारले व केरळा ब्लास्टर्सने जबरदस्त पुनरागमन साधताना सामना ४-२ फरकाने जिंकला.

हेर्रेराची जागा ऑस्ट्रेलियन पावलो रेट्रे याने घेतली, तर मानोलो यांनी ७४व्या मिनिटास आणखी एक महत्त्वाचा बदल केला. यलो कार्ड मिळालेल्या निम दोरजी याच्या जागी आयुष छेत्री याला मैदानात उतरविले.

संघाच्या पराभवास हे दोन बदल कारणीभूत असल्याचे मार्केझ यांचे मत आहे. ‘‘मला वाटतं, बोर्हा हेर्रेरा याने मैदान सोडले तेव्हा आम्ही सामन्यावरील नियंत्रण गमावले. आणखी एक बदल करताना मी चुकलो.

निम (दोरजी) याला यलो कार्ड मिळाल्यामुळे मी खेळाडू बदलण्याचे ठरविले. हा निर्णय पूर्णतः चुकला. त्यानंतर बचावात आमच्यावर अरिष्ट ओढवले. बोर्हा मैदानात असेपर्यंत मध्यफळीत राखलेले नियंत्रण आम्ही साफ गमावले,’’ असे खंत व्यक्त करताना मार्केझ यांनी सामन्यानंतर सांगितले.

उत्तरार्धातील चुका टाळण्याकडे भर

एफसी गोवाचा पुढील सामना बुधवारी (ता. २८) मुंबई येथे मुंबई सिटीविरुद्ध होणार आहे. सध्या ते २८ गुणांसह पाचव्या स्थानी असून मुंबई सिटी ३१ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

पुढील लढतीविषयी मार्केझ म्हणाले, की ‘‘पराभव पचवणे आमच्यासाठी कठीण आहे, पण आम्ही व्यावसायिक आहोत. तीन दिवसांत आम्हाला मुंबईत खेळायचे आहे आणि अशाप्रकारचा (केरळा ब्लास्टर्सविरुद्ध) उत्तरार्ध टाळण्याचा प्रयत्न करू.’’

केरळा ब्लास्टर्सविरुद्ध एफसी गोवाने पूर्वार्धात छान खेळ केला, पण प्रतिस्पर्ध्यांनी एक गोल केल्यानंतर आपल्या संघाने अवसान गमावल्याचे निरीक्षण मार्केझ यांनी नोंदविले.

मोहन बागान व नॉर्थईस्ट युनायटेविरुद्धही असेच घडले, वेळीच सावरण्याची क्षमता आपल्या संघात नसल्याची नाखुशी त्यांनी यावेळी केली.

मैदानावरील नेतृत्वहीन संघ

एफसी गोवाच्या सध्याच्या कामगिरीवर निराशा व्यक्त करताना मार्केझ कठोरपणे म्हणाले, की ‘‘मैदानावर आम्ही सध्या नेतृत्वहीन आहोत. प्रशिक्षक असल्यामुळे ती त्यास जास्त कारणीभूत आहे.

सलग तीन पराभव पत्करले, तरी हे फुटबॉल आहे याची जाणीव ठेवावी लागेल. आम्हाला पुढे जायचे आहे. मुंबईत जेथे सध्या चांगला खेळणारा संघ आहे, त्यांच्याविरुद्ध परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावेच लागतील.’’

संदेश (झिंगन) व व्हिक्टर (रॉड्रिगेझ) यांच्या अनुपस्थितीत संघाला स्वभाववृत्ती प्रदर्शित करण्यात अपयश येत असल्याची खंत मार्केझ यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरे गुन्हेगार मोकाट, आमच्या मुलांना अटक का केली? नरकासूर प्रकरणी होंडा ग्रामस्थ एकवटले, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

ना भाकरीचा प्रश्न सुटला ना जीव वाचला; कोकण रेल्वेखाली सापडून दोन्ही पाय तुटले, ओडिशाच्या तरुणाचा गोव्यात मृत्यू

IND W vs NZ W: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय ओपनर्सचा डबल धमाका! स्मृती मानधना-प्रतिका रावलने ठोकले शतक, रचला नवा इतिहास! VIDEO

Ind vs Aus 2nd ODI: 17 वर्षानंतर Adelaide मध्ये हरली टीम इंडिया! 2-0 ने मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

Goa Politics: दिल्लीतून पैसे घेतल्याची एक तरी सेटिंग सिद्ध करून दाखवा, RGP पक्षच बंद करू; तुकारामांचे 'मायकल'ना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT