I-League 2 Dainik Gomantak
गोवा

I-League 2 Football Tournament: धेंपो क्लबचा विजय, स्पोर्टिंग गोवा पराभूत

I-League 2 Football Tournament: माजी विजेत्या संघासाठी शुभम रावतचा गोल निर्णायक

किशोर पेटकर

I-League 2 Football Tournament: सामन्याच्या सातव्या मिनिटास शुभम रावत याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर माजी आय-लीग विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने रविवारी आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेत महत्त्वपूर्ण विजयाची नोंद केली.

पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे त्यांनी युनायटेड स्पोर्टस क्लबला १-० असे हरविले. आणखी एका सामन्यात स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

धेंपो क्लबचा हा सहाव्या सामन्यातील तिसरा विजय ठरला. त्यांचे आता १० गुण झाले असून ते चौथ्या क्रमांकावर आले आहेत.

युनायटेड क्लबला सातव्या लढतीत चौथा पराभव ठरला. त्यामुळे त्यांची सात गुणांसह पाचव्या क्रमांकावर घसरणा झाली. धेंपो क्लबचा स्पर्धेतील पुढील सामना 30 मार्च रोजी ऑरेंज एफसीविरुद्ध घरच्या मैदानावर होईल.

विजयामुळे बंगळूरची स्थिती सुधारली

बंगळूर येथे स्पोर्टिंग क्लब बंगळूरने स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला १-० असे हरविले. २९व्या मिनिटास श्रावण शेट्टी याने नोंदविलेल्या गोलमुळे बंगळूरच्या संघाला गुणतक्त्यातील स्थिती सुधारता आली.

त्यांचा हा सात लढतीतील पाचवा विजय ठरला. त्यामुळे १५ गुणांसह ते दुसऱ्या स्थानी राहिले व आता अव्वल स्थानावरील संघापेक्षा त्यांचा एक गुण कमी आहे.

पहिल्या क्रमांकावर असलेल्या एफसी बंगळूर युनायटेडचे सात लढतीतून १६ गुण आहेत. आर्मांद कुलासो यांच्या मार्गदर्शनाखालील स्पोर्टिंग गोवा संघाला सातव्या लढतीत तिसरा पराभव पत्करावा लागला.

दहा गुणांसह ते तिसऱ्या क्रमांकावर कायम राहिले. स्पोर्टिंग गोवाचा पुढील सामना अवे मैदानावर सुदेवा दिल्ली एफसीविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: खाण क्षेत्र सुधारणांसाठी गोव्याला 400 कोटी! मुख्यमंत्र्यांनी मानले PM मोदींचे आभार; राज्य सरकारच्या प्रयत्नांना बळ

Goa Crime: 'राज्यात गुन्‍हे कमी, चर्चा जास्त'! DGP आलोक कुमार यांचे निरीक्षण; गुन्‍हेगारीसंदर्भातील घटना Viral होत असल्याचा दावा

Vasudev Balwant Phadke: नोकरीला लाथ मारली, अन्यायाविरुद्ध लढा उभारला, इंग्रजांना सळो की पळो केलं, पण फंद फितुरीनं घात केला; वाचा वासुदेव बळवंत फडकेंची संघर्षगाथा!

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

SCROLL FOR NEXT