Santosh Trophy Dainik Gomantak
गोवा

Santosh Trophy: गोव्यासमोर मणिपूरचा अडथळा

Santosh Trophy: उपांत्य फेरी पार करण्याचे आव्हान

किशोर पेटकर

Santosh Trophy: संतोष करंडक राष्ट्रीय सीनियर फुटबॉल स्पर्धेची १४व्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी गोव्याचा संघ इच्छुक आहे, पण त्यापूर्वी त्यांना उपांत्य लढतीत धोकादायक मणिपूरचा अडथळा पार करावा लागेल.

अरुणाचल प्रदेशमधील युपिया-इटानगर येथील गोल्डन ज्युबिली स्टेडियमवर गुरुवारी (ता. ७) दोन्ही उपांत्य लढती होतील.

अगोदर सहा वेळच्या विजेत्या सेनादलासमोर एक वेळ ही स्पर्धा जिंकलेल्या मिझोरामचे आव्हान असेल. नंतर प्रकाशझोतात पाच वेळच्या गोव्याविरुद्ध माजी विजेत्या मणिपूरची लढत होईल.

उपांत्यपूर्व फेरीत गोव्याने दिल्लीचे कडवे आव्हान २-१ फरकाने परतावून लावले, तर मणिपूरने आसामचा ७-१ फरकाने धुव्वा उडविला.

मणिपूरचा संघ धोकादायक

मणिपूरही स्पर्धेच्या मुख्य फेरीत अपराजित आहे. ब गट साखळी फेरीत त्यांनी चार विजय व एका बरोबरीची नोंद केली.

प्राथमिक फेरीपासून ते ११ सामने खेळले असून १० विजय नोंदविले असून एक सामना बरोबरीत राखला आहे. स्पर्धेत त्यांनी एकूण ३४ गोल केले असून त्यापैकी ११ गोल फिजाम सनाथोई सिंग याने नोंदविले आहेत.

स्पर्धेत गोव्याचा संघ अपराजित

स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झालेला गोव्याचा संघ पराभूत झालेला नाही. उपांत्यपूर्व लढतीसह त्यांनी सहा सामन्यांत तीन विजय व तीन बरोबरी अशी कामगिरी साधताना १२ गोल नोंदविले असून आठ गोल स्वीकारले आहेत.

याशिवाय प्राथमिक फेरीतही गोव्याचा संघ अपराजित (३ विजय, १ बरोबरी) राहिला. गोव्यातर्फे मुख्य फेरीत नेसियो फर्नांडिस, जोशुआ डिसिल्वा, लॉईड कार्दोझ यांनी प्रत्येकी तीन, तर महंमद फाहीज, डेल्टन कुलासो व ज्योबर्न कार्दोझ यांनी प्रत्येकी एक गोल केला आहे.

शेवटची अंतिम फेरी २०१७ मध्ये

२०१७ साली गोव्याने स्पर्धेची अखेरच्या वेळेस अंतिम फेरी गाठली होती. तेव्हा स्पर्धा गोव्यात झाली होती आणि बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर अतिरिक्त वेळेत पश्चिम बंगालकडून पराभव (०-१) पत्करावा लागल्यामुळे स्पर्धेत आठव्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

नंतर २०१८-१९ मोसमात गोव्याने उपांत्य फेरी गाठली होती, मात्र लुधियाना येथे पंजाबकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

गोव्याने स्पर्धेतील पाचवे विजेतेपद २००८-०९ मध्ये बंगालला हरवून प्राप्त केले होते. मणिपूरने स्पर्धेत २००२-०३ मध्ये विजेतेपद मिळविले, तर २०१०-११ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

‘‘मणिपूर तुल्यबळ संघ आहे. त्यांच्या खेळाडूंना फुटबॉलची चांगली जाण आहे. साहजिकच आम्ही त्यांचा आदर करतो. दोन्ही संघ अपराजित असल्यामुळे चाहत्यांना दर्जेदार फुटबॉल अनुभवता येईल. फुटबॉल हा अनिश्चिततेने भारलेला खेळ असल्यामुळे भाकीत करता येणार नाही. मैदानावर आम्हाला सर्वोत्तम योगदान द्यावे लागेल.’’

- चार्ल्स डायस, गोव्याचे प्रशिक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budargad Accident: गोव्याहून नेपाळकडे जाणाऱ्या बसचा अपघात! चालकाचे नियंत्रण जाऊन घुसली शेतात; 2 प्रवासी गंभीर जखमी

Horoscope: पैशाचा पाऊस पडणार, परदेशी जाण्याची संधी; 'या' राशींचे बदलणार भविष्य

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

Goa: शेतकऱ्यांसाठी दिलासा! ‘हजारी केळी’ बनली बागायतदारांसाठी ‘ढाल’; खेतींपासून होतोय बचाव

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

SCROLL FOR NEXT