Manolo Marquez Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: एफसी गोवा आयएसएल ‘शिल्ड’साठी दावेदार

Indian Super League: प्रशिक्षक मार्केझ आशावादी ः बाकी पाचही सामने जिंकण्याचा निर्धार

किशोर पेटकर

Indian Super League: एफसी गोवा संघाला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ‘शिल्ड’ जिंकण्याची संधी असल्याचा दावा मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. बाकी पाचही सामने जिंकण्याचा आपल्या संघाचा निर्धार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘‘होय, एफसी गोवा संघ शिल्ड विजेतेपद मिळवू शकतो. आम्ही सामने जिंकण्यावर सारे अवलंबून आहे. इतर संघांचे निकाल आम्ही नियंत्रित करू शकत नाही, पण आम्ही आमचे सामने जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहू,’’ असे 55 वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शक म्हणाले.

एफसी गोवा व पंजाब एफसी यांच्यातील सामना सोमवारी (ता. ११) नवी दिल्लीत खेळला जाईल. त्या पार्श्वभूमीवर मार्केझ बोलत होते.

एफसी गोवा संघाने दोन बरोबरी व तीन पराभवानंतर मागील लढतीत फातोर्ड्यात ईस्ट बंगालला एका गोलने हरवून ‘शिल्ड’साठी दावा कायम राखला. ईस्ट बंगालविरुद्ध काही संधी हुकल्या, आम्हाला आणखी गोल करणे शक्य होते, तरीही आपला संघ ईस्ट बंगालविरुद्धच्या लढतीत चांगला खेळल्याचे मार्केझ यांनी नमूद केले. एफसी गोवाने १७ लढतीत नऊ विजय नोंदविताना ३२ गुणांसह चौथा क्रमांक प्राप्त केला आहे.

पंजाब एफसी संघ तुल्यबळ

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे एफसी गोवाने पंजाब एफसीला एका गोलने हरविले होते, तेव्हा विजयासाठी एफसी गोवास झुंजावे लागले होते. त्या अनुषंगाने मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘पंजाब एफसीने मागील काही सामन्यांत चांगला खेळ केलेला आहे.

त्यांच्यापाशी दर्जेदार खेळाडू असून ते प्ले-ऑफ फेरीतील सहाव्या जागेसाठी ते प्रयत्नशील आहेत. पंजाबविरुद्धचा सामना आमच्यासाठी निश्चितच सोपा नसेल.’’ सध्या पंजाब एफसीचे १८ सामन्यांतून २० गुण आहेत. अगोदरच्या सामन्यात त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला धक्का दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT