Indian Super League Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: एफसी गोवाच्या खाती पूर्ण गुण

किशोर पेटकर

Indian Super League: उत्तरार्धात बंगळूर एफसीचा एक खेळाडू कमी झाल्याचा लाभ उठवत एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी रात्री 2-1 असा विजय प्राप्त केला.

सामना संपण्यास नऊ मिनिटे बाकी असताना बोरिस सिंग याने केलेला गोल यजमानांसाठी निर्णायक ठरला. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सामना झाला.

एफसी गोवाच्या विजयात ओडेई ओनाइंडिया याने २२व्या, तर बोरिसने ८१व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास शिवाल्दो सिंग याने बंगळूरला आघाडी मिळवून दिली होती.

त्यांच्या सुरेश सिंग वांगजाम याला 47 व्या मिनिटास थेट रेड कार्ड मिळाले. एफसी गोवाचा हा 19 सामन्यांतील दहावा विजय ठरला. त्यांचे आता 36 गुण झाले असून तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती झाली आहे.

प्रत्येकी 39 गुण असलेले मुंबई सिटी व मोहन बागान संघ अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर 35 गुणांसह ओडिशा चौथ्या स्थानी आहे. स्पर्धेतील आठव्या पराभवामुळे बंगळूर एफसीच्या प्ले-ऑफ फेरी गाठण्याच्या शक्यतेला धक्का बसला.

त्यांचे 19 लढतीनंतर 21 गुण व आठवा क्रमांक कायम राहिला. एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना पाच एप्रिल रोजी फातोर्डा येथेच हैदराबाद एफसीविरुद्ध होईल.

पूर्वार्धात बरोबरी, उत्तरार्धात विजयी गोल

पूर्वार्धातील ४७व्या मिनिटास बंगळूरचा एक खेळाडू कमी झाल्याची संधी एफसी गोवाने साधली. त्यापूर्वी पूर्वार्धात दोन्ही संघ १-१ असे गोलबरोबरीत होते.

सुरेश सिंग वांगजामच्या सरळ रेषेतील पासवर एफसी गोवा संघाला ऑफसाईड व्यूहरचनेबाबत गोंधळ नडला आणि सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास शिवाल्दो सिंग याने बंगळूरला आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर २२व्या मिनिटास कॉर्नर फटक्यावर गोलक्षेत्रात बंगळूरच्या खेळाडूंतील समन्वयक चुकला आणि ओडेई ओनाइंडिया याच्या गोलमुळे यजमान संघाला बरोबरी साधता आली. यावेळी ओडेई याच्या हेडिंगवर बोरिसने गोलनेटच्या दिशेने चेंडू मारला.

त्यानंतर चेंडूने पुन्हा ओडेई याच्या पायाला लागून गोलनेटमध्ये गेला. ४७व्या मिनिटास गोलक्षेत्रात एफसी गोवाच्या बोरिस सिंगला पाडल्यानंतर त्याला सुरेशने लाथ मारली.

यावेळी रेफरीने बंगळूरच्या खेळाडूस थेट रेड कार्ड दाखविले आणि बाकी कालावधीत पाहुण्या संघाला दहा खेळाडूंसह खेळावे लागले.

८१व्या मिनिटास बदली खेळाडू बोर्हा हेर्रेरा याच्या पासवर बंगळूरचा बचाव उघडा पडला, गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू जाग्यावर नसल्याची संधी हेरत बोरिस सिंग याने अगदी जवळून एफसी गोवाला आघाडी मिळवून देणारा गोल केला.

घरच्या मैदानावरील सहावा विजय

एफसी गोवाने २०२३-२४ मोसमातील आयएसएल स्पर्धेत गुरुवारी फातोर्डा येथील घरच्या मैदानावरील सहावा विजय नोंदविला.

एकंदरीत यंदा या मैदानावर त्यांनी नऊ सामन्यांतून १९ गुण प्राप्त केले आहेत. यामध्ये सहा विजयांचे १८ व एका बरोबरीचा एक गुण आहे. अन्य दोन लढतीत पराभूत व्हावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT