Super Cup Football Dainik Gomantak
गोवा

Super Cup Football: बंगळूरला एका गोलने नमवत एफसी गोवाचा निसटता विजय

Super Cup Football: सामना बरोबरीकडे झुकत असताना मुहम्मद नेमिल याच्या क्रॉस पासवर ब्रायसनने अचूक हेडिंग साधले आणि गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटली.

किशोर पेटकर

Super Cup Football: सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये ब्रायसन फर्नांडिस याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवाने सुपर कप फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या लढतीत त्यांनी बंगळूर एफसीला 1-0 फरकाने नमविले.

ब्रायसन फर्नांडिसने 90+3 व्या मिनिटास हेडिंगद्वारे गोल नोंदवून पुढील फेरी गाठण्याची एफसी गोवाची आशा कायम राखली.

सामना बरोबरीकडे झुकत असताना मुहम्मद नेमिल याच्या क्रॉस पासवर ब्रायसनने अचूक हेडिंग साधले आणि गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटली.

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने अगोदरच्या लढतीत इंटर काशी संघाला 2-1 फरकाने नमविले होते. बंगळूर एफसीचा हा सलग दुसरा पराभव असून त्यांचे ड गटातील आव्हान संपुष्टात आले.

गोदरच्या लढतीत त्यांना ओडिशा एफसीनेही एका गोलने हरविले होते. एफसी गोवाचा पुढील सामना सोमवारी (ता. 22) गतविजेत्या ओडिशा एफसीविरुद्ध होईल.

गमावलेल्या संधी

सामन्यात एफसी गोवा संघाला आणखी गोल करण्याच्या संधी होत्या, परंतु बंगळूरने त्यांना यश मिळू दिले नाही. दुसऱ्याच मिनिटास नोआ सदोईच्या असिस्टवर कार्लोस मार्टिनेझचा धोकादायक फटका बंगळूरचा गोलरक्षक साहिल पूनिया याने वेळीच रोखला.

34 व्या मिनिटास बंगळूरनेही एफसी गोवाच्या क्षेत्रात मुसंडी मारली, मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. 47 व्या मिनिटास शंकर संपिंगिराज याचा हेडर एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंगने चपळाईने अडविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: भोमा येथील रस्त्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सावंत यांचे स्पष्टीकरण नाही

SCROLL FOR NEXT