Darshan Misal  Dainik Gomantak
गोवा

Goa Cricket Association: दर्शन मिसाळकडे गोव्याचे नेतृत्त्व कायम

जयपूर येथील सराव, सय्यद मुश्ताक अली करंडकासाठी संघ

किशोर पेटकर

Goa Cricket Association गतमोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत कर्णधार या नात्याने उल्लेखनीय ठरलेल्या दर्शन मिसाळ याच्याकडे आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी नेतृत्त्व कायम ठेवण्यात आले.

16 ऑक्टोबरपासून खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी, तसेच त्यापूर्वी जयपूर येथील शिबिरासाठी शनिवारी संघ निवडण्यात आला.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव रोहन गावस देसाई यांनी १६ सदस्यीय संघ व चार राखीव खेळाडू जाहीर केले. मध्यमगती शुभम तारी, डावखुरा फिरकी गोलंदाज विकास सिंग संघातील नवे चेहरे, तर महाराष्ट्राचा राहुल त्रिपाठी, कर्नाटकचा के. व्ही. सिद्धार्थ हे संघातील नवे ‘पाहुणे’ आहेत. २०२२-२३ मोसमात गोव्याने टी-२० क्रिकेट स्पर्धेत सातपैकी चार सामने जिंकले होते, तर तीन लढतीत पराभव पत्करला होता.

यंदा गोव्याचा समावेश ‘क’ गटात असून सामने झारखंडमधील रांची येथे १६ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत खेळले जातील. गोव्याचा संघ अनुक्रमे आंध्र, मणिपूर, गुजरात, अरुणाचल प्रदेश, रेल्वे, पंजाब, सौराष्ट्र यांच्याविरुद्ध खेळेल.

गोव्याचा टी-२० संघ

ईशान गडेकर, राहुल त्रिपाठी, के. व्ही. सिद्धार्थ, सुयश प्रभुदेसाई, दर्शन मिसाळ (कर्णधार), दीपराज गावकर (उपकर्णधार), तुनीष सावकार, मोहित रेडकर, अर्जुन तेंडुलकर, लक्षय गर्ग, शुभम तारी, विकास सिंग, कश्यप बखले, राजशेखर हरिकांत, स्नेहल कवठणकर, फेलिक्स आलेमाव, राखीव ः विजेश प्रभुदेसाई, हेरंब परब, शुभम देसाई, कीथ पिंटो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT