FC Goa: एफसी गोवाचा वार्षिक ‘मीडिया डे’ संपन्न; संघ मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरित

प्रत्येक खेळाडूस जबाबदारी पार पाडायची आहे- रवी
FC Goa
FC GoaDainik Gomantak

FC Goa नव्या मोसमातील ध्येयप्राप्तीसाठी आम्ही एकत्रित मेहनतीला प्राधान्य दिले असून प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित असल्याचे मत एफसी गोवा संघाचा कर्णधार ब्रँडन फर्नांडिस याने शनिवारी व्यक्त केले.

एफसी गोवा संघाचा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेपूर्वीचा वार्षिक ‘मीडिया डे’ शनिवारी झाला. त्यावेळी क्लबतर्फे यंदा सातवा मोसम खेळणाऱ्या ब्रँडनने आगामी मोसमाबद्दल प्रतिक्रिया दिली.

यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्केझ, खेळाडू रॉलिन बोर्जिस, ब्रायसन फर्नांडिस, स्पॅनिश ओडेई ओनाइंडिया, क्लबचे सीईओ रवी पुस्कूर यांची उपस्थिती होती.

एफसी गोवाचा स्पर्धेतील पहिला सामना सोमवारी (ता. 2) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पंजाब एफसीविरुद्ध होईल.

प्रशिक्षक मार्केझ यांनी यापूर्वी हैदराबाद एफसीतर्फे आयएसएल स्पर्धेत सफलता प्राप्त केली आहे. 2023-24 मोसमात एफसी गोवाचा मार्गदर्शक या नात्याने स्पॅनिश प्रशिक्षकाने चांगल्या कामगिरीचे लक्ष्य बाळगले आहे.

संघ एका खेळाडूवर अवलंबून नाही: रवी

‘‘आम्ही एका खेळाडूवर अवलंबून नाही. प्रत्येक खेळाडूस जबाबदारी पार पाडायची आहे. नव्या मोसमात संघाच्या तत्त्वज्ञानानुसारच खेळ होईल आणि चाहत्यांचा पाठिंबा कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहू,’’ असे एफसी गोवाचे सीईओ रवी पुस्कूर यांनी सांगितले.

FC Goa
Goa Red Alert: पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा; नियंत्रण कक्षांशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com