Football Tournament  Dainik Gomantak
गोवा

77th Santosh Cup National Football Tournament 09 ऑक्टोबरपासून; गोव्याची सलामी छत्तीसगडशी

संतोष करंडक फुटबॉल: ‘अ’ गटातील सामने फातोर्ड्यात

किशोर पेटकर

77th Santosh Cup National Football Tournament अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने 77 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील वेळापत्रक जाहीर केले. गोव्याचा समावेश असलेल्या ‘अ’ गटातील सामने नऊ ऑक्टोबरपासून फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळले जातील.

स्पर्धेत गोव्याचा पहिला सामना छत्तीसगडविरुद्ध होईल. केरळ, गुजरात, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर हे गटातील अन्य संघ आहेत. फातोर्ड्यातील सामने सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात खेळले जातील.

17 ऑक्टोबर रोजी अ गटसाखळी फेरीतील अखेरच्या दिवशी गोवा व केरळ या दोन मातब्बर संघांतील सामना खेळला जाईल. हे दोन्ही संघ माजी विजेते आहेत. गोव्याने संतोष करंडक स्पर्धा पाच वेळा जिंकली आहे.

मात्र 2008-09 नंतर त्यांना भारतीय फुटबॉलमधील हा प्रतिष्ठेचा करंडक जिंकता आलेला नाही. केरळने स्पर्धा सात वेळा जिंकली असून २०२१-२२ मध्ये त्यांनी शेवटच्या वेळेस विजेतेपद पटकावले होते.

अ गट वेळापत्रक (सर्व सामने पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम फातोर्डा):

तारीख ९ ऑक्टोबर ः जम्मू-काश्मीर विरुद्ध गुजरात (सकाळी ९ वाजता), छत्तीसगड विरुद्ध गोवा (संध्याकाळी ४ वाजता).

तारीख ११ ऑक्टोबर ः गुजरात विरुद्ध केरळ (सकाळी ९ वाजता), जम्मू-काश्मीर विरुद्ध छत्तीसगड (संध्याकाळी ४ वाजता).

तारीख १३ ऑक्टोबर ः केरळ विरुद्ध जम्मू-काश्मीर (सकाळी ९ वाजता), गोवा विरुद्ध गुजरात (संध्याकाळी ४ वाजता).

तारीख १५ ऑक्टोबर ः छत्तीसगड विरुद्ध केरळ (सकाळी ९ वाजता), गोवा विरुद्ध जम्मू-काश्मीर (संध्याकाळी ४ वाजता).

तारीख १७ ऑक्टोबर ः गुजरात विरुद्ध छत्तीसगड (सकाळी ९ वाजता), केरळ विरुद्ध गोवा (संध्याकाळी ४ वाजता).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

SCROLL FOR NEXT