37th National Games Dainik Gomantak
गोवा

37th National Games: भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे यादी जाहीर, सिंधू, प्रणॉयसह प्रमुख बॅडमिंटनपटूंची निवड

सांघिक गटातील पुरुष व महिला संघ, तसेच वैयक्तिक आणि दुहेरीतील खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

किशोर पेटकर

37th National Games गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी दोन वेळची ऑलिंपिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, तसेच एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत या जागतिक स्पर्धा पदक विजेत्या प्रमुख आंतरराष्ट्रीय खेळाडूंची भारतीय बॅडमिंटन संघटनेने निवड केली आहे.

भारतीय बॅडमिंटन संघटनेने 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मानांकनानुसार सांघिक गटातील पुरुष व महिला संघ, तसेच वैयक्तिक आणि दुहेरीतील खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे 25 ऑक्टोबरला उद्‍घाटन होईल.

त्यापूर्वी बॅडमिंटन स्पर्धा (सांघिक व वैयक्तिक) 19 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत खेळली जाईल, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव संजय मिश्रा यांनी नमूद केले आहे.

गोव्याला एकूण सात जागा

एकेरी व दुहेरीत यजमान या नात्याने गोव्याला एकूण सात जागा मिळाल्या आहेत. पुरुष व महिला एकेरीत प्रत्येकी 16 खेळाडू पदकासाठी दावेदार असतील.

पुरुष व महिला गटातील वैयक्तिक एकेरीत यजमान या नात्याने गोव्यातील खेळाडूंसाठी प्रत्येकी दोन जागा आरक्षित आहेत.

पुरुष व महिला दुहेरी, तसेच मिश्र दुहेरीत एकूण आठ जोड्यांत गोव्यासाठी प्रत्येकी एक जागा आहे.

भारताची उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टो महिला दुहेरी व मिश्र दुहेरीत, तर अनुरा प्रभुदेसाई महिला एकेरीत गोव्यातर्फे खेळणार असल्याची माहिती गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी दिली.

सांघिक गटातील विभागवार पात्र संघ

पुरुष: कर्नाटक (दक्षिण), उत्तराखंड (पूर्व), महाराष्ट्र (पश्चिम), दिल्ली (उत्तर), आसाम (ईशान्य), गोवा (यजमान).

महिला: आंध्र प्रदेश (दक्षिण), पश्चिम बंगाल (पूर्व), महाराष्ट्र (पश्चिम), पंजाब (उत्तर), आसाम (ईशान्य), गोवा (यजमान).

निवडण्यात आलेले प्रमुख खेळाडू

पुरुष (कंसात जागतिक क्रमांक व राज्य) ः एच. एस. प्रणॉय (७, केरळ), लक्ष्य सेन (१३, उत्तराखंड), किदांबी श्रीकांत (२१, आंध्र प्रदेश), प्रियांशू राजावत (२८, मध्य प्रदेश), किरण जॉर्ज (३९, केरळ), एम. मिथुन (४६, कर्नाटक), दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी (आंध्र प्रदेश).

महिला (कंसात जागतिक क्रमांक व राज्य) ः पी. व्ही. सिंधू (१४, आंध्र प्रदेश), आकर्षी कश्यप (३८, छत्तीसगड), मालविका बनसोड (४७, महाराष्ट्र), अश्मिता चलिहा (४९, आसाम), दुहेरीत पुल्लेला गायत्री गोपिचंद (तेलंगणा).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Jersey Stolen: BCCI च्या ऑफिसमध्ये 6.52 लाखांची चोरी; मुंबई, चेन्नईसह अनेक IPL संघांच्या जर्सी गायब, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

SCROLL FOR NEXT