Spiritual Tourism Goa Dainik Gomantak
गोवा

Spiritual Tourism: गोव्यात 'एकादशा तीर्थयात्रा' उपक्रम! प्रमुख 11 मंदिरांना देता येणार भेटी; आध्यात्मिक पर्यटनाला संजीवनी

Spiritual Tourism Goa: गोवा पर्यटन खात्याने राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला नवसंजीवनी देण्यासाठी ‘एकादशा तीर्थयात्रा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा पर्यटन खात्याने राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला नवसंजीवनी देण्यासाठी ‘एकादशा तीर्थयात्रा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील अकरा प्रमुख मंदिरांना एका सुसंगत प्रवास मार्गात एकत्रित करणाऱ्या या यात्रेला आकार देण्यासाठी पर्यटन संचालक केदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकील जीटीडीसीचे विपणन व हॉटेल विभागाचे उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर, साहाय्यक पर्यटन संचालक जयेश काणकोणकर तसेच संबंधित अकरा मंदिर समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीची सुरवात एकादशा तीर्थयात्रेची संकल्पना आणि नियोजन स्पष्ट करणाऱ्या सविस्तर सादरीकरणाने झाली. यात दररोज चार मंदिरांना भेट देत एकूण तीन दिवसांच्या आध्यात्मिक अनुभवाचा आराखडा मांडण्यात आला.

प्रत्येक मंदिराच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला असून, जवळच्या पर्यटनस्थळांचा समावेश करून प्रवास अधिक समृद्ध करण्याची दिशा ठरवण्यात आली.

या बैठकीदरम्यान मंदिर समित्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि आध्यात्मिकतेचा सन्मान राखत पर्यटन विकास घडवून आणण्याच्या उद्देशाला पाठिंबा दर्शविला.

श्री मंगेश मंदिर, मंगेशी

श्री महालसा नारायणी मंदिर, म्हार्दोळ

श्री महादेव मंदिर, तांबडी-सुर्ला

श्री सप्तकोटेश्वर मंदिर, नार्वे

श्री ब्रह्मा मंदिर, सत्तरी

श्री शांतादुर्गा मंदिर, फातर्पा

श्री हरी मंदिर, मडगाव

श्री दामोदर मंदिर, जांबावली

श्री परशुराम मंदिर, पैंगीण

श्री महागणपती मंदिर, खांडोळा

श्री दत्तात्रेय मंदिर, साखळी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT