Goa Spice Cultivation Dainik gomantak
गोवा

Goa Spice Cultivation: जायफळ, वेलची, काळी मिरीला बाजारात मागणी; गोव्यात मसाला पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Goa Agriculture: राज्यातील अनेक बागायतींमध्ये पोफळीच्या (सुपारीच्या) झाडांवर मिरीवेली प्रामुख्याने पाहायला मिळतात.

गोमंतक ऑनलाईन टीम

​पणजी: राज्यातील बागायती क्षेत्रात जायफळ, वेलची, काळी मिरी आणि तिखी यांसारख्या विविध मसाल्यांच्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असून, गेल्या पाच वर्षांत मसाले लागवडीखालील क्षेत्रफळात सातत्यपूर्ण वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

राज्यातील अनेक बागायतींमध्ये पोफळीच्या (सुपारीच्या) झाडांवर मिरीवेली प्रामुख्याने पाहायला मिळतात. कमी जागेत आणि मुख्य पिकासोबत आंतरपीक म्हणून घेता येत असल्याने ही मसाले पिके शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्न देणारी महत्त्वपूर्ण बागायती पिके ठरली आहेत.

कृषी क्षेत्रातील आकडेवारीनुसार, सन २०२१-२२ मध्ये राज्यात २६० हेक्टर क्षेत्रावर मसाल्यांची लागवड होती आणि त्यातून १८ टन उत्पादन मिळाले होते. त्यानंतरच्या वर्षांत लागवडीखालील क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. सन २०२२-२३ मध्ये २६६ हेक्टर क्षेत्रावरून १९ टन उत्पादन झाले, तर २०२३-२४ मध्ये क्षेत्रफळ २६६ हेक्टरवर स्थिर राहून उत्पादन १६ टन इतके नोंदवले गेले. मात्र, गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांचा कल पुन्हा मसाले पिकांकडे वाढला असून २०२४-२५ मध्ये लागवड क्षेत्र २७७ हेक्टरवर (उत्पादन १८ टन), तर २०२५-२६ मध्ये २७९ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे आणि यातून १९ टन उत्पादन मिळाले आहे.

आर्थिक उत्पन्न वाढण्यास मोठी मदत

पाच वर्षांच्या या आकडेवारीवरून असे स्पष्ट होते की, राज्यातील बागायतदार शेतकरी पारंपारिक पिकांसोबतच मसाले पिकांच्या लागवडीला प्राधान्य देत आहेत. बाजारपेठेत मसाल्यांना असलेली बारमाही मागणी आणि चांगला दर यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident News: दोन महिन्यांपूर्वी घेतली कार, 100च्या स्पीडमध्ये 20 फूट हवेत उडून झाडावर आदळली… भीषण अपघातात 7 तरुणांचा मृत्यू

Mohammed Siraj Selection: मोहम्मद सिराजला प्लेइंग-11 मधून वगळण्यावरुन राजकीय वादंग! काँग्रेस नेत्याने तोडले तारे; म्हणाले, 'नावामुळे भेदभाव...' VIDEO

Under 16 Cricket: गोव्याचा पहिला डाव 97 धावांत आटोपला; कर्नाटकने पहिल्याच दिवशी 127 धावांची आघाडी घेत वर्चस्व गाजवले

T20 Cricket: दिल्लीचे आव्हान गोव्यासाठी अवघड, 23 वर्षांखालील महिला टी-20 करंडक क्रिकेट स्पर्धेत पराभव

Tiger Conservation: गोव्यातील वाघ गणनेचा अहवाल कुठे अडकला? निष्कर्ष जाहीर करण्याची राजेंद्र केरकर यांची मागणी

SCROLL FOR NEXT