Damodar Music School Dainik Gomantak
गोवा

Goa: गुरुपौर्णिमेनिमित्त दामोदर संगीत विद्यालयाचा खास ऑनलाईन कार्यक्रम

असे मत मडगाव (Madgaon) येथील श्री दामोदर संगीत विद्यालयाचे (Damodar Music School) नृत्य व योग शिक्षक गौरव व्यास यानी सांगितले.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: या आधुनिक काळात बहुतेक लोकांना गुरु-शिष्य परंंपराच माहित नाही. पूर्वीच्या काळात शिष्य गुरुचा आदर करीत. गुरुही अभ्यास पुर्ण झाल्यावर सुद्धा शिष्याला मार्गदर्शन करीत. पण आता गुरु-शिष्य संबंधांमध्ये दरी निर्माण झाल्याचे जाणवते. शाळांमध्ये शिक्षक अभ्यासक्रमापुरते शिकवतात व एकदा विद्यार्थी पदवी घेऊन उत्तिर्ण झाले की नंतर गुरु व शिष्य आप आपल्या वाटेने जातात. शिष्य़ म्हणजेच विद्यार्थी गुरुचा अनादर करताना दिसतात. गुरु व शिष्यामंध्ये जो विश्र्वास निर्माण व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही असे मत मडगाव येथील श्री दामोदर संगीत विद्यालयाचे (Damodar Music School) नृत्य व योग शिक्षक गौरव व्यास यानी सांगितले.

गौरव व्यास हे राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रिय नृत्याचे नर्तक असुन ते राष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यक्रम, कार्यशाळांमध्ये सहभागी होतात. गुरु हा कोणीही होऊ शकतो. गुरु बनण्यासाठी वयोमर्यादेची गरज भासत नाही. आई, वडील, शिक्षक हे आपले गुरुच. विद्यार्थी सुद्धा गुरुचे गुरु होऊ शकतात. विद्यार्थ्यांचे निरिक्षण केल्यावर त्यांच्याकडुन सुद्धा गुरुला शिकण्यासारखे पुष्कळ गुण आढळतात ्असेही व्यास यांनी सांगितले. आपण स्वता विद्यार्थ्यांकडुन अनेक चांगले गुण आत्मसात केल्याचे व्यास यानी सांगितले. पुराणात सुद्धा शिवाचे दुसरे पुत्र कार्तिकेयनने शिवाला प्रणव मंत्र ओमचा अर्थ सांगितल्याची नोंद आहे. हा मंत्र ब्रम्हाला सुद्धा माहीत नव्हता असे म्हटले आहे असेही व्यास यांनी सांगितले. गुरु म्हणजे एक शक्ती. ही शक्ती घेणारे हे शिष्य असतात असेही व्यास यांनी सांगितले.

गुरुपौर्णिमा निमित्त खास कार्यक्रम

गुरुपौर्णिमा निमित्त श्री दामोदर संगीत विद्यालयाने नृत्य व योगाचा खास ऑनलाईन कार्यक्रम शनिवारी आयोजित केला आहे. योग विद्यार्थी चंद्र नमस्काराचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. सर्वांना सुर्यनमस्कार माहित आहे. चंद्रनमस्कार याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व असल्याचे गौरव व्यास यांनी सांगितले. 2021-22 वर्षातील हा पहिला कार्यक्रम आहे.

सद्या या शाळेत 50 पेक्षा विद्यार्थी नृत्याचे धडे घेतात तर 20 ते 30 लोक योग अभ्यास करतात अशी माहिती व्यास यांनी दिली. लॉक़डाऊन व कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे ते म्हणाले. सद्या दोन्ही वर्ग ऑनलाईन व प्रत्यक्ष असे दोन्ही माध्यमातुन सुरु असल्याचेही व्यास यानी सांगितले. नृत्याचे विद्यार्थी त्याना शिकवलेली नृत्ये सादर करतील. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची परिक्षा जवळ पोहोचली असल्याने या कार्यक्रमाद्वारे त्यांना सराव करण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे व्यास यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT