Goa MLA's Study Tour to Leh Ladakh Dainik Gomantak
गोवा

Goa Government: गोव्याचे मंत्री-आमदार घेणार लेह-लडाखच्या विकासाचे धडे

विधानसभेच्या विविध समित्यांचे अभ्यास दौरे बंद पडल्याबाबत रमेश तवडकरांनी खंत व्यक्त केली

दैनिक गोमन्तक

Goa MLA's Study Tour to Leh Ladakh: राज्यघटनेचे 370 वे कलम रद्द केल्यानंतर लेह-लडाखचा अल्पावधीत विकास कसा केला, हे पाहण्यासाठी मंत्री-आमदारांचा अभ्यास दौरा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी आयोजित केला आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांत विधानसभेच्या विविध समित्यांचे अभ्यास दौरे बंद पडल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. ६ ते १० सप्टेंबरदरम्यान हा दौरा होणार आहे.

तवडकर म्हणाले की, देशात इतर ठिकाणी विकास कसा केला जातो, प्रश्न सोडवण्यासाठी तेथील लोकप्रतिनिधी कोणती उपाययोजना करतात, याचा अभ्यास लोकप्रतिनिधींनी जरूर केला पाहिजे.

मी पूर्वी आमदार असताना अशा अभ्यास दौऱ्यांत सहभागी होत होतो. त्यातून ग्रामीण भागाच्या विकासाची, विशेषतः लोकसहभागातून विकासाची संकल्पना सुचली.

आर्थिक तरतूद आहे, तरीही...

विधानसभेच्या विविध समित्यांचे अभ्यास दौरे काढण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद असते; पण असे दौरेच कोणी आयोजित करत नाही, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी दोन समित्यांचे मिळून एकत्रित दौरे आयोजित केले जात.

आता तेही बंद पडले आहेत. आपण दुसऱ्या भागात न गेल्याने नवसंकल्पनांची माहिती मिळत नाही. ती संधी मिळावी, यासाठी सर्व मंत्री-आमदारांसाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे.

31 ऑगस्टपर्यंत मुदत

जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लेह-लडाख हा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला आहे. मूळ राज्य प्रशासनातील; पण भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झालेले मायकल डिसोझा हे गोमंतकीय अधिकारी सध्या लेह-लडाखमध्ये सचिव म्हणून कार्यरत आहेत.

त्या भागात आता हा अभ्यास दौरा आखण्यात आला आहे. या अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊ इच्छीणाऱ्या मंत्री-आमदारांनी ३१ ऑगस्टपर्यंत आपली स्वीकृती कळवावी, असे विधिमंडळ सचिवालयाला अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT