Cuncolim Industrial Estate Dainik Gomantak
गोवा

Cuncolim Industrial Estate: दुर्गंधी, वायु प्रदूषण, सांडपाणी! कुंकळ्ळीतील समस्यांचे ग्रहण सुटेना; ग्रामस्थ आक्रमक

या प्रकारामुळे लगतच्या शेतजमिनी खराब बनत चालल्या असून लोकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय.

Ganeshprasad Gogate

Cuncolim Industrial Estate: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधीलं प्रदूषण प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले असून त्याचा फटका स्थानिक रहिवाश्यांना बसत आहे. येथील अनेक प्रकल्पांतील सांडपाणी उघड्यावर तसेच चर मारुन त्यात सोडले जात आहे.

या प्रकारामुळे लगतच्या शेतजमिनी खराब बनत चालल्या असून लोकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. त्याशिवाय कंपनीमधून निघणाऱ्या धुरामुळे वायूप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत आहे. कुंकळ्ळीतील औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाविरोधात याआधीही नागरिकांनी वारंवार राज्य सरकारचे लक्ष वेधलेले होते.

मात्र सरकारकडून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांनी एकत्र येत कारवाईची मागणी केलेली आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांतून होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी करण्यात आलेली होती.

मात्र त्यावर काहीशी दंडात्मक कारवाई करण्यात आली मात्र आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या नसल्याने परिस्थिती गंभीर बनत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जातेय. .

कुंकळ्ळीतील औद्योगिक वसाहतीत अनेक कामगार बेकायदेशीपणे राहत आहेत. प्रकल्पातील पाणी प्रक्रिया केल्याशिवाय सोडण्यात येत असल्याने शेतजमिनी खराब होतात.

यापेक्षाही धक्कादायक म्हणजे सांडपाणी बोअरवेल मारुन जमिनीत सोडण्यात येत असल्याने भविष्यात याचे गंभीर परिणाम स्थानिकांच्या आरोग्यावर होणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

तसेच पाण्याच्या जादा उपशामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असून या सर्व गोष्टी बंद होऊन कुंकळ्ळीवासीयांचा त्रास कमी होणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरु ठेवणार असल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT