Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism : विठ्ठलदासवाडा किनारी अतिक्रमण सुरूच : पर्यटक घटले

Goa Tourism : लाकडी पलंग, टेबल्‍स घालून अडथळा; कारवाई करण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism :

मोरजी, राज्यात पर्यटकांची संख्या घटत चालली आहे. याला कारणे अनेक असली तरी बेशिस्त पर्यटन हे सर्वांत मोठे कारण आहे.

विशेषतः किनारपट्टी भागात पर्यटन व्यावसायिकांकडून कोणतीही शिस्त पाळली जात नाही, उलट किनारपट्टीचा जीव घोटण्याचा प्रयत्न हे व्यावसायिक करतात असे चित्र अनेक ठिकाणी दिसते. मोरजीतील विठ्ठलदासवाडा येथील किनारा याचे एक द्योतक आहे.

या किनारी भागातील खासगी जागेत जी हॉटेल, शॅक्स, रिसॉर्ट आहेत, त्यांनी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. शेकडो लाकडी पलंग, टेबल घालून किनारा अडवला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र या विरोधात कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. पर्यटन खात्याचे अधिकारी तसेच स्थानिक पंचायतीनेही याकडे दुर्लक्ष चालवले आहे.

विठ्ठलदासवाडा किनारी भागात फेरफटका मारला तर व्यावसायिकांनी किनाऱ्यावर अतिक्रमण करत थेट समुद्राच्या पाण्यापर्यंत पलंग आणि टेबल, खुर्च्या मांडून ठेवलेल्या दिसतात. गेल्या वर्षी पर्यटन खात्याने एका व्यावसायिकांवर कारवाई केली होती. परंतु पुन्हा अतिक्रमण वाढले आहे.

पर्यटनमंत्र्यांनी दिला होता इशारा

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी येथील दौऱ्यावेळी अतिक्रमणाविरोधात कारवाईचा इशारा दिला होता. मात्र आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. किनारी भागातील पर्यटनात शिस्त आणण्यास सरकार अपयशी ठरत आहे, असा आरोप करण्‍यात येत अाहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

SCROLL FOR NEXT