मोरजी येथे मगो कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद  Dainik Gomantak
गोवा

पाणी समस्या सोडवा अन्यथा 'घागर मोर्चा'

मोरजीत मगोच्या कार्यकर्त्यांचा पत्रकार परिषद घेऊन इशारा

Dainik Gomantak

Goa: मोरजी (Morjim) पंचायत क्षेत्रात दिवसेंदिवस पाण्याची गंभीर समस्या (Water Problem) बनत असून जर दोन दिवसात पाण्याची समस्या सुटली नाही तर सोमवारी पेडणे पाणी विभागावर 'घागर मोर्चा' (Protest) नेण्याचा इशारा मोरजीच्या मगोच्या कार्यकर्त्यानी २२ रोजीच मोरजी येथे मगोच्या (MGP) कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला. यावेळी वंदना शेटगावकर, सुरेखा मोरजे, ज्ञानेश्वरी मोरजे, प्रगती सावंत व जोत्सना शेटगावकर आदी उपस्थित होते.

वंदना शेटगावकर यांनी बोलताना मोरजीतील पाण्याची समस्या गंभीर असून यापूर्वी नागरिकांनी आमदार दयानंद सोपटे शिवाय पाणी विभागाच्या अभियत्याना सांगितले, पाणी येणार असे उत्तर दिले जाते मात्र आज पर्यंत सुरळीत पाणी पुरवठा केला नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त करून तेम्बवाडा मोरजी या भागात अनियमित पाणी पुरवठा असतो असे त्या म्हणाल्या.

सुरेखा मोरजे यांनी बोलताना टेंबवाडा मोरजी येथे तर मागच्या सहा महिन्यापासून पाणी येते, बोरिंग चे पाणी गढूळ येत रात्री कधीतरी पाणी येते त्यामुळे जागरण करावे लागते. सरकारने आम्हाला पाणी द्यावे अशी मागणी सुरेखा मोरजे यांनी केली.

प्रगती सावंत यांनी बोलताना सरकारने आम्हाला मोफत पाणी देण्याची घोषणा केली आहे, त्यापेक्षा नियमित किमान दोन तास तरी पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाहीतर दोन दिवसात आम्ही पेडणे पाणी विभागावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा दिला

मोरजीत काही भागात पाणी पुरवठा सुरळीत असते तर काही भागात पाणीच नसते, जोस्ना शेटगावकर यांनी बोलताना रस्याच्या बाजूला जे आपले घर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रेशरने पाणी येते मात्र आतल्या भागात पाणी येत नाही, रस्त्याच्या आत जी घरे आहेत त्याना नळाच्या पाण्याचा थेंब सुधा पहायला मिळत नसल्याचे शेटगावकर यांनी सांगितले.

दरम्यान मागच्या चार दिवसांपूर्वी टेम्बवाडा मोरजी येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पाणी समस्याच सोडवली नाही तर घागर मोरचा नेण्याचा त्या नागरिकांनीही इशारा दिला होता आता मगो महिला नेत्यांनीही सरकार एका बाजूने जनतेला निवडणुकीच्या तोंडावर मोफत पाणी पुरवठा करण्याची घोषणा करते. मात्र नागरिकाना मागच्या सहा महिन्यापासून नळाना पाणी येत नाही. त्याकडे स्थानिक आमदार अभियंते आणि सरकार यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. हि स्थिती आहे टेंबवाडा मोरजी येथील.

मागच्या सहा महिन्या पासून या भागातील नागरिकाना पाण्याची समस्या आहे. नागरिकांनी चतुर्थीपूर्वी स्थानिक आमदार दयानंद सोपटे यांची भेट घेवून आपली कैफियत मांडली होती. त्यावेळी आमदार दयानंद सोपटे यांनी संबधित अधिकारी व पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सुचना देताना पाणी सुरळीत करण्याचे सांगितले होते.

शशिकला मोरजे यांनी प्रतिक्रिया देताना मागच्या सहा महिन्यापासून लोकांच्या दारात रात्रो ३ नंतर जावून पाणी आणावे लागते, रस्त्याच्या बाजूला जी घरे आहे त्याना थोड्या प्रमाणात नळाचे पाणी येते. मात्र रस्त्यापासून जी दूर घरे आहेत त्या घराना नळाचा थेंब येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

Donald Trump: अमेरिकेत नवा वाद! जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन यांच्या पंक्तीत आता डोनाल्ड ट्रम्प; 'त्या' फोटोनं जगाला चक्रावलं

SCROLL FOR NEXT