Sadanand Tanavade Dainik Gomantak
गोवा

Goa Solapur Train: गोवा-सोलापूर रेल्वेसाठी प्रयत्न करणार! तानावडेंनी दिली ग्वाही; राज्यसभेत विषय केला उपस्थित

sadanand Tanavade: जनतेची सूचना होती म्हणून संसदेत हा विषय मांडला. आता रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव पाठवून या विषयाचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

Goa Solapur Train Updates

पणजी: गोव्यातून सोलापूरला जाणारी रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा विषय राज्यसभेत विशेष उल्लेखाद्वारे उपस्थित केला आहे. ही रेल्वेसेवा पुन्हा सुरू करावी यासाठी पाठपुरावा करू, असे राज्यसभेचे सदस्य सदानंद शेट तानावडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, अक्कलकोट, गाणगापूर व सोलापूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा सोयीची होती. नंतर ती बंद करण्यात आली. ती सुरू करावी अशी मागणी करावी अशी जनतेची सूचना होती म्हणून संसदेत हा विषय मांडला. आता रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव पाठवून या विषयाचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपले केवळ नऊ प्रश्नच स्वीकारले गेले. कारण प्रत्यक्ष कामकाजासाठी ७ दिवस मिळाले होते, असे नमूद करून ते म्हणाले, १० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणखीन प्रश्न चर्चेला येतील.

स्मार्ट सिटीचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे फायदे समजून येतील. सध्या कामे सुरू असल्याने थोडा त्रास जाणवत आहे. नेवरा येथे रेल्वे स्थानक होणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकल्पाला काहीजण विरोध हे करतच असतात, असेही तानावडे म्हणाले. भाजपच्या माध्यम विभागाचे निमंत्रक प्रेमानंद म्हांब्रेे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: पालेकरांचा ‘आघाडी’ला हात की खोडा?

Attack on Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करावर दोन ठिकाणी हल्ले; 25 जवान ठार, 3 वाहने उद्ध्वस्त; BLAनं VIDEO केला शेअर

Mhadei Water Dispute: 'म्‍हादई' नदीची ताबडतोब पाहणी करा, सरकारची 'म्‍हादई प्रवाह'कडे मागणी; 'इंटरलोक्युटरी' अर्ज सादर करणार

Dasun Shanaka Century: 12 उत्तुंग षटकार, 4 खणखणीत चौकार... दासुन शनाकाचा 'रुद्र अवतार'! 39 चेंडूत ठोकलं शतक VIDEO

Mormugao Port: मुरगाव बंदरातील कंटेनर वाहतूक ठप्प; नियमित फीडर सेवा बंद पडल्याने उद्योगांना फटका

SCROLL FOR NEXT