Illegal Construction In Goa Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction In Goa: सुकूर येथील 'ते' बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे पंचायतीचे आदेश

या प्रकरणी गजानन चारी यांना बार्देश ग्रामपंचायतीने त्यांची इमारत काढून टाकण्यास सांगितले होते.

Ganeshprasad Gogate

Illegal Construction In Goa सरकारने राज्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा टाकण्यास सुरवात केली असून यामुळे अशा प्रकारची बांधकामं करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

काल म्हणजे बुधवारी (दि. 25ऑक्टोबर) हरमल येथील बेकायदेशीर बांधकाम केलेली चार मजली हॉटेलची इमारत पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सील केली असून आज बार्देश सुकूर येथील बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश पंचायतीने दिले असल्याची प्राथमिक मिळालेली आहे.

या प्रकरणी गजानन चारी यांना बार्देश ग्रामपंचायतीने त्यांचे सर्व्हे क्रमांक 12/1, गाव सोकोरो मधील अनधिकृत दुमजली बांधकाम केलेली इमारत काढून टाकण्यास सांगितले होते. तसेच याकामी त्यांना 15 दिवसांचा अवधी देखील देण्यात आला होता. मात्र त्यांनी दिलेल्या वेळेत बांधकाम न पाडल्याने पंचायतीने ही कारवाई केल्याचे सांगितले जातेय.

या कारवाईमुळे साहजिकच अनधिकृत बांधकामांना आळा बसेल असा सूर उमटत आहे. सीआरझेड तसेच किनारपट्टी क्षेत्रातल्या बेकायदेशीर बांधकामांवर सरकारी यंत्रणेने कारवाई असे आदेश खंडपीठाने हरमल येथील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी दिले आहेत.

पोलीस फौजफाट्यासह पंचायतीचे अधिकारी गुरुवारी संध्यकाळच्या सुमारास ती बेकायदेशीर इमारत पाडण्यासाठी आले. मात्र सदर घर मालकाचे वय 73 वर्षे असून जे घर पाडण्यासाठी ऑर्डर काढण्यात आली होती ते त्याचे निवासी घर आहे.

संबंधित व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला आश्रय घेण्यासाठी कोणताही आधार नसल्याने हे प्रकरण काही कारणास्तव तहकूब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISI च्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT