Goa Smart City smart bus leakage Dainik Gomantak
गोवा

Smart Bus: पहिल्याच पावसात ‘स्मार्ट’ बसेस फेल! छपरातून पाणीगळती; प्रवाशांचा भिजत प्रवास

Goa Smart Bus: गोवा स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत अलीकडेच सार्वजनिक वाहतुकीसाठी घेण्यात आलेल्या नव्या स्मार्ट बसेस पहिल्याच पावसात गळतीमुळे अडचणीत सापडल्या आहेत.

Sameer Panditrao

पणजी: गोवा स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत अलीकडेच सार्वजनिक वाहतुकीसाठी घेण्यात आलेल्या नव्या स्मार्ट बसेस पहिल्याच पावसात गळतीमुळे अडचणीत सापडल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर ठरणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पहिल्याच पावसात बसच्या छपरातून पाणी गळू लागल्याने प्रवाशांना भिजतच प्रवास करावा लागला. स्मार्ट बसमध्ये शिरलो आणि भिजलो, अशा शब्दांत काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. अत्यंत खर्चिक योजना राबवून देखील आवश्यक गुणवत्तेची खात्री न घेतल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची टीका प्रवाशांकडून केली जात आहे. पावसाळा सुरु झाला असताना बसमध्येच गळती होत असेल, तर आगामी महिन्यांत स्थिती अधिक बिकट होण्याची भीती आहे.

अपेक्षा भंगल्या

स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये "स्मार्ट" ही संकल्पना फक्त नावापुरती राहिली आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. जनतेने विश्वास ठेवून वापरायला सुरवात केलेल्या बस सेवा जर तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण व धोकादायक ठरत असतील, तर ही गोष्ट गंभीर असून त्यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील रस्त्यावर झाडांच्या फांद्या पावसाळ्याच्या तोंडावर कापण्यात आल्या असल्या, तरी हे काम अपूर्ण राहिल्यामुळे काही फांद्या आता अधिक धोकादायक ठरत आहेत. मंगळवारी संध्याकाळी पडलेल्या पावसात एका झाडाची छोटी फांदी चारचाकी वाहनावर पडली.

सुदैवाने गाडीचे मोठे नुकसान टळले, मात्र भविष्यात अशा घटना टाळाव्यात यासाठी नागरिकांनी मागणी केली आहे. स्थानिकांच्या मते, या भागातील झाडांच्या फांद्या योग्य प्रकारे कापल्या गेल्या नसल्यामुळे त्या अजूनही रस्त्यावर झुकलेल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP Poster War: रुमडामळमध्‍ये 'पोस्टर वॉर', भाजपचे दोन गट भिडले! पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

Goa Politics: कामत, तवडकर बिनखात्याचेच; पाच दिवस उलटले, खाते वाटपास आणखी विलंब शक्य‍

Court Verdict: 4.52 कोटींच्या वीज घोटाळा प्रकरणी माविन गुदिन्हो दोषमुक्‍त, पर्रीकरांनी केले होते आरोप; तब्‍बल 27 वर्षानंतर निकाल

Rashi Bhavishya 26 August 2025: मनातील गोंधळ कमी होईल, महत्त्वाच्या कामांना गती मिळेल; वाचा तुमच्या राशीचं भविष्य

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

SCROLL FOR NEXT