कारापूर सरपंचपदी दामोदर गुरव बिनविरोध  Dainik Gomantak
गोवा

Goa: सव्वा चार वर्षात सहावा 'सरपंच'

सरपंच पदासाठी दामोदर गुरव यांनी एकट्यानेच अर्ज केला होता. या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून अनुक्रमे गोकुळदास सावंत आणि लक्ष्मण गुरव यांनी सही केली.

दैनिक गोमन्तक

डिचोली: कारापूर-सर्वण पंचायतीच्या (Panchayat) सरपंच पद हे अपेक्षेप्रमाणे विद्यमान उपसरपंच दामोदर गुरव यांना मिळाले. आज पार पडलेल्या निवडणुकीत त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली. दामोदर गुरव (Damodar Gurav) यांच्या रूपाने गेल्या सव्वा चार वर्षात या पंचायतीला आता सहावा 'सरपंच' मिळाला आहे.

मागील जुलै महिन्यात गोकुळदास सावंत (Gokuldas Sawant) यांनी सरपंचपदाचा राजिनामा दिला. त्यानंतर हे पद रिक्त झाले होते. रिक्त सरपंच पदाची निवड करण्यासाठी आज पंचायत मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीस माजी सरपंच गोकुळदास सावंत यांच्यासह दामोदर गुरव, लक्ष्मण गुरव, योगेश पेडणेकर, सुषमा सावंत, रेश्मी नाईक, आजस खान, दत्तप्रसाद खारकांडे आणि महमद हुसेनसाब मदार हे पंचसदस्य उपस्थित होते. तर उज्वला कवळेकर आणि नीता मोरजकर अनुपस्थित होत्या.

सरपंच पदासाठी दामोदर गुरव (Damodar Gurav)यांनी एकट्यानेच अर्ज केला होता. या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून अनुक्रमे गोकुळदास सावंत आणि लक्ष्मण गुरव यांनी सही केली. निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित असलेले डिचोली गट विकास कार्यालयातील विस्तार अधिकारी भारत महाले यांनी हा अर्ज ग्राह्य धरून गुरव यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पंचायत सचिव(Secretary) सुजाता मोरजकर यांनी सहकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT