Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case: गोवा जमीन हडपप्रकरणी सुहैल, ओमकारला 3 दिवस कोठडी; राहुल देसाईही पोलिसांच्या रडारवर

Land Grabbing Case: बार्देशचे माजी मामलेदार राहुल देसाई यांचाही समावेश असल्याने त्यांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

Land Grabbing Case: गोवा राज्यातील जमीन हडपप्रकरणी एसआयटीने अटक केलेल्या अट्टल गुन्हेगार महम्मद सुहैल व ओमकार पालेकर या दोघांना न्यायालयाने काल तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. एसआयटीने दाखल केलेल्या गुन्ह्यात बार्देशचे माजी मामलेदार राहुल देसाई यांचाही समावेश असल्याने त्यांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांना दोन गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे.

रोलँड रेमोडिओस याने तक्रार दाखल करून त्याची जमीन हडप करण्यात आल्याचे नमूद केले आहे. 5 नोव्हेंबर पूर्वी मामलेदार कार्यालयात बनावट दस्तावेजद्वारे जमीन हडप केल्याचे मिळवलेल्या माहिती उघड झाली आहे.

या जमीन हडपप्रकरणात सँड्रिक फर्नांडिस, आंतोनेता फर्नांडिस ऊर्फ आंतोनिंता फर्नांडिस ऊर्फ आंतोनेट फर्नांडिस, मारिया अँजेला फर्नांडिस ऊर्फ मारिया अँजेली फर्नांडिस ऊर्फ मारिया अँजेलिका फर्नांडिस, राहुल देसाई (माजी मामलेदार, बार्देश) यांनी संगनमत करून ही जमीन हडप केली असा दावा तक्रारदारने केला होता.

बनावट दस्तावेजाद्वारे या जमिनीच्या म्युटेशनची प्रक्रिया माजी मामलेदार राहुल देसाई यांच्यासमोर झाली होती. महम्मद सुहैल याच्याविरुद्ध एसआयटीने पाचहून अधिक गुन्ह्यात अटक केली आहे. एसआयटीकडून गुन्हा दाखल करून तपासकाम सुरू असलेल्या प्रकरणांची संख्या 45 वर गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT