Mining  Dainik Gomantak
गोवा

Sirigao Mining Hearing: देवी लईराई मंदिरासह घरेदारे खाण परिक्षेत्रातून वगळा- स्थानिकांची मागणी

Sirigao Mining Hearing: शिरगाव जनसुनावणीत खाण लीज क्षेत्रासह कोमुनिदाद जमीन विषयावरही चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

Sirigao Mining Hearing: शिरगाव पंचायतीसह बहुतांश लोकांचे मायनिंगला समर्थन असले, तरी खाणविषयक नियमांचे पालन करतानाच, गावातील प्रश्न सोडवून आणि गाव सांभाळूनच खाणी सुरू करा, अशी प्रमुख मागणी आज झालेल्या जनसुनावणीवेळी पुढे आली.

शिरगाव खाण ब्लॉक-३ अंतर्गत शिरगाव खाणीसाठी आज (गुरुवारी) जनसुनावणी घेण्यात आली. किरकोळ अपवाद वगळता दुपारपर्यंत जनसुनावणी शांततेत आणि सुरळीतपणे चालली.

शिरगाव खाण ब्लॉक 95.6712 हेक्टर क्षेत्रफळात व्यापला आहे. प्रतिवर्ष 0.5 मिलीयन टन खनिज उत्पादन करण्यासाठी शिरगाव येथील खाणीला पर्यावरणीय दाखला आवश्यक आहे. त्यासाठी ही जनसुनावणी घेण्यात आली.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डॉ. शर्मिला मोंतेरो आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांच्या निरीक्षणाखाली वाठादेव-डिचोली येथील नारायण झांट्ये बहुउद्देशीय सभागृहात ही जनसुनावणी आयोजित केली होती.

यावेळी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार अभिजीत गावकर आदी अधिकारी उपस्थित होते. पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) अहवाल सादरीकरण केल्यानंतर जनसुनावणीस प्रारंभ झाला.

यापूर्वी खाणी कार्यरत असताना खाण परिक्षेत्रावर परिणाम झालेला नाही. उलट घरे वाढली आहेत. मंदिराचा विस्तार झाला आहे, असे विश्वंभर गावकर यांनी स्पष्ट करून आताच खाण परिक्षेत्र मुद्द्यावर बोट ठेवणे, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करून खाण व्यवसाय सुरू करण्यास समर्थन दिले.

या जनसुनावणीवेळी दुपारपर्यंतच्या सत्रात बाबूसो गावकर, उदय गावकर, अमित गावकर, अजय गावकर, प्रशांत धारगळकर आदींनी आपली मते मांडली.

खाण व्यवसायामुळे गावातील शेती-बागायती नष्ट झाल्यात त्याला खाणवाल्यासह काही स्थानिकही तेवढेच जबाबदार असल्याचे स्पष्ट मत एका नागरिकाने मांडले. दुपारपर्यंत ४० पेक्षा अधिक लोकांनी आपली मते मांडली.

जनसुनावणीवेळी गोंधळ:-
आजच्या जनसुनावणीवेळी अपेक्षेनुसार गर्दी झाली नाही. उपस्थितांमध्ये शिरगावमधील लोकांचाच अधिक भरणा होता. महिलांची संख्याही जेमतेम होती. 250 ते 300 च्या आसपास लोक होते.

जनसुनावणीवेळी शिरगाव येथील एक नागरिक मत मांडत होते. त्यांचे म्हणणे लांबल्यामुळे डिचोलीतील एका नागरिकाने त्यांना आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिरगावमधील काहीजण संतापले. त्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

पंचायत मायनिंगच्या बाजूने:-

गावाच्या हितासाठी खाण व्यवसाय सुरू होणे गरजेचे आहे, असे मत शिरगावच्या सरपंच करिश्मा गावकर यांनी मांडून खाण व्यवसायाला पाठिंबा देणारा ठरावही पंचायतीने घेतल्याचे सांगितले.

खाण बंद झाल्यापासून अनेकजण संकटात आले आहेत, असे उपसरपंच जयंत गावकर म्हणाले. खाण व्यवसाय सुरू झाला तर बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, असेही ते म्हणाले.

कोमुनिदादची जमीन ताब्यात द्या

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले शिरगाव येथील देवी लईराईसह अन्य मंदिरे आणि घरेदारे खाण परिक्षेत्रातून बाहेर काढूनच खाण व्यवसाय सुरू व्हावा, असे मत श्री लईराई देवस्थानचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी मांडले.

खाणी सुरू करण्याअगोदर खाणवाल्यांनी कब्जा मिळवलेली कोमुनिदादची जमीन आधी परत करा, अशी मागणीही त्यांनी केली. खाण परिक्षेत्र मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Aus 2nd ODI: 17 वर्षानंतर Adelaide मध्ये हरली टीम इंडिया! 2-0 ने मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

Goa Politics: दिल्लीतून पैसे घेतल्याची एक तरी सेटिंग सिद्ध करून दाखवा, RGP पक्षच बंद करू; तुकारामांचे 'मायकल'ना ओपन चॅलेंज

मडगाव रेल्वे स्टेशनवर दोन भीषण अपघात! धावत्या ट्रेनमध्ये चढताना एकाचा मृत्यू; Watch Video

Viral Video: पठ्ठ्यानं ट्रेनलाच बांधली स्टीलची पेटी, सोशल मीडियावर जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा लोकांमुळेच बिहार बदनाम होतोय'

Ind vs Aus 2nd ODI: सचिन-विराटलाही जमला नाही 'तो' कारनामा केला, चौकार मारुन रचला इतिहास; कांगारुंच्या भूमीवर हिटमॅनचा रेकॉर्डब्रेक फॉर्म VIDEO

SCROLL FOR NEXT